पुणे। आज(23 नोव्हेंबर) प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटन विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स संघात सामना पार पडणार आहे. हा सामना पुणेरी पलटनसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण हा सामना त्यांचा प्रो कबड्डीतील 100 वा सामना असणार आहे.
याआधी प्रो कबड्डीत 100 सामने खेळण्याची कामगिरी फक्त पटना पायरेट्स संघाने केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 103 सामने खेळले आहेत. त्यामुळे पुणेरी पलटन आता प्रो कबड्डीमध्ये 100 सामने खेळणारा केवळ दुसराच संघ ठरणार आहे.
तसेच बंगळूरु बुल्स संघाचे घरचे सामने पुण्याला हलवण्यात आल्याने पुणेरी पलटनला हा ऐतिहासिक सामना घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळणार आहे.
पुणेरी पलटनने आत्तापर्यंत 99 सामने प्रो कबड्डीमध्ये खेळले आहेत. त्यामुळे सध्या ते प्रो कबड्डीत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत यू मुम्बासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यू मुम्बानेही प्रो कबड्डीमध्ये 99 सामने खेळले आहेत.
पुणेरी पलटनचा जयपूर पिंक पँथर विरुद्धचा सामना आज रात्री 9 वाजता श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्पेक्स, बालेवाडी येथे पार पडणार आहे.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ-
103 सामने – पटना पायरेट्स
99 सामने – पुणेरी पलटन
99 सामने – यू मुम्बा
93 सामने – जयपुर पिंक पँथर्स
93 सामने बेंगाल वॉरियर्स
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–४७ वर्षीय भारतीय खेळाडूने हॅट्रिक घेत केला विश्वविक्रम
–जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात
–भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया: दुसरा टी20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द