fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्याच्या इब्राहिमची इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत आघाडी

Former Asian Rotax runner-up wins both Pro Races of Mumbai Falcons Indian e-Racing Championship Belwarier wins Junior Class

August 6, 2020
in अन्य खेळ, टॉप बातम्या
0

पुण्याच्या मुहम्मद इब्राहिमने वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत चमक दाखवली. त्याने चेन्नईच्या अमित कुट्टीला मागे टाकत आपल्या प्रो श्रेणीतील आपल्या सर्व रेस जिंकल्या.
 
इब्राहिम हे जागतिक रोटॅक्स कारटिंग फायनल्समध्ये सहभाग नोंदवला तर, आशियाई रोटॅक्स चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपद मिळवले. इब्राहिमने रेसमध्ये सुरुवातीपासूनच चमक दाखवत आपली छाप पाडली.त्याने उटीच्या निरंजन कुमारला मागे टाकत 1:47.778 वेळेसह पोल पोझिशन मिळवली. दुसऱ्या हंगामातील चॅम्पियन साई पृथ्वी तिसरा तर, कुट्टीला चौथ्या स्थानी पोहोचता आले. अंकित त्यागी त्याच्या पुढे होता.
 
इब्राहिमने आपल्या रेसची चांगली सुरुवात करत आघाडी घेतली. कुट्टीने चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. इब्राहिमने आपला हाच फॉर्म कायम ठेवत कुट्टी आणि पृथ्वीला मागे टाकत विजय मिळवला. राघव बुधीराजा ( दिल्ली) आणि अब्दुल हादी (त्रिसूर) यांनी अनुक्रमे 14 व्या आणि 15 व्या स्थानावरून सुरुवात करत अव्वल पाच जणांमध्ये स्थान मिळवले.
 
दुसऱ्या रेसमध्ये विश्वास विजयराजला अपघातामुळे फटका बसला. इब्राहिमने त्याचा फायदा घेत कुट्टी आणि चेल्वेन फर्नांडिस (मुंबई) यांना मागे ढकलले. साई पृथ्वी आणि निरंजन कुमार यांनी आघाडीच्या पाच जणांमध्ये स्थान मिळवले.मुहम्मद इब्राहिम आणि इतर रेसर्सने गुणतालिकेत आघाडी घेतली. पहिल्या स्थानासाठी चांगली चुरस ही पहायला मिळाली. या संपूर्ण स्पर्धेत सर्व स्पर्धकांमध्ये चांगली चुरस दिसत आहे असे वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडियाचे प्रमुख सिरीसा विसा यांनी सांगितले.
 
दुसऱ्या फेरीत ज्युनिअर श्रेणीच्या सायी सरन ( चेन्नई) याने चांगली सुरुवात केली. त्याने उज्ज्वल बेलीवारीअर (बंगळुरू) आणि गर्वित अग्रवाल (गुडगाव).पण, बेलीवारीअरने अविनाश गुप्ता ( कालीपोंग) आणि अग्रवाल यांच्या पुढे आघाडी घेतली.
सहा वेळचा जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या आणि 11 मोटरस्पोर्ट्स विजेतेपद मिळवणाऱ्या रॉनी वेचसेलबेर्गेर हे गेस्ट रेसर्स होते. तांत्रिक कारणामुळे त्यांनी पहिल्या रेसमध्ये सहभाग नोंदवला नाही. पण, दुसऱ्या रेसमध्ये त्यांनी नववे स्थान मिळवले. पहिल्या रेसमध्ये मकाऊच्या फ्रेडरिको जोक्वीन नवव्या स्थानी राहिला.
 
 मुंबई फालकन्स इंडियन रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये कार्ट रेसर मुहम्मद इब्राहिम यांनी सहभाग नोंदवल्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी आपल्या श्रेणीत अमित कुट्टी आणि साई पृथ्वी याहून अधिक चांगली कामगिरी केली असे मुंबई फालकन्सचे सीईओ मोईद तुंगेकर म्हणाले.
 
 आमच्या आर आर ई स्पोर्ट्स सोशल मीडिया चॅनेलमध्ये लाईव्ह रेसला चांगला पाठिंबा मिळत आहे. यासोबत आमचे साथीदार मुंबई फालकन्स आणि वोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया यांसह गेमर कनेक्टचे स्वागत असे आयोजक आणि कारटिंग किंगचे रायोमंद बानाजी यांनी सांगितले.

Previous Post

४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप

Next Post

युएईत आपल्या बॅटच्या तालावर गोलंदाजांना नाचवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या ‘या’ क्रिकेटरची पत्नी आहे डान्स टीचर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Curtsey : Twitter/ICC
क्रिकेट

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals
क्रिकेट

“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

January 21, 2021
Next Post
Photo Curtesy: Twitter/ Mipaltan

युएईत आपल्या बॅटच्या तालावर गोलंदाजांना नाचवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या 'या' क्रिकेटरची पत्नी आहे डान्स टीचर

Photo Courtesy: Twitter/ KKRiders & SunRisers

आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज

Photo Courtesy: Instagram/ PriyaPunia

सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची 'ही' महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.