---Advertisement---

देवदत्त पडिक्कलच्या धडाकेबाज शतकामुळे पंजाबचा पराभव; कर्नाटकने 20-20 स्टाईलमध्ये गाठले 250 धावांचे लक्ष्य

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 8:50 PM
---Advertisement---

रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या साखळी फेरीतील कर्नाटक आणि पंजाब यांच्यात एक महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पंजाबचा संघ आपल्या स्टार खेळाडूंशिवाय मैदानात उतरला होता. टॉस जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात त्यांनी ३०९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात २५६ धावांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे, कर्नाटकने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ५ गड्यांच्या मोबदल्यात २५२ धावा करत कर्नाटकने सामना खिशात घातला. या विजयात कर्णधार देवदत्त पडिक्कलने अष्टपैलू कामगिरी केली.

​टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या पंजाबसाठी अभिजीत गर्गने ८१ धावांची खेळी केली. कर्णधार उदय सहारनने ४४ धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली, तर इमोनजीत सिंह चहलने ८३ धावांचे योगदान दिले. त्यांच्या या खेळीमुळे पंजाबने ९२ षटकांत ३०९ धावा उभारल्या. कर्नाटककडून विद्याधर पाटीलने ४, तर श्रेयस गोपालने ३ बळी घेतले. कर्नाटकच्या पहिल्या डावात केएल राहुलने ५९ आणि मयंक अग्रवालने ४६ धावा केल्या.

​शेवटी श्रेयस गोपालने ७७ धावांची भर घातल्यामुळे कर्नाटकचा संघ ११०.२ षटकांत ३१६ धावांपर्यंत पोहोचू शकला. पंजाबसाठी हरप्रीत बराडने ४ आणि सुखदीप बाजवााते ३ गडी बाद केले. पंजाबच्या दुसऱ्या डावात कर्णधार उदय सहारनने ९३ धावांची झुंजार खेळी केली, तर अनमोलप्रीत सिंहने ४४ धावा जोडल्या. कर्नाटकसाठी श्रेयस गोपाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

​सामन्याच्या शेवटच्या दिवशी कर्नाटकला विजयासाठी आक्रमक पद्धतीने २५० धावांचे लक्ष्य गाठायचे होते. यावेळी केएल राहुल अवघ्या १३ धावा करून बाद झाला. मात्र, कर्णधार देवदत्त पडिक्कलने अवघ्या ८५ चेंडूत १२० धावांची तुफानी नाबाद खेळी केली, ज्यात ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. मयंक अग्रवालने दुसऱ्या डावातही ५३ धावांचे योगदान दिले. शेवटी श्रेयस गोपालने २२ चेंडूत ३३ धावांची वेगवान खेळी केल्यामुळे कर्नाटकने ५ गडी राखून सामना जिंकला. या विजयासोबतच कर्नाटकचा संघ पुढच्या फेरीत पोहोचला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---