IPL 2025 Qualifier 1: आयपीएल 2025च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जचा संघ अवघ्या 101 धावांवर ऑलआउट झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) च्या गोलंदाजांनी कहर माजवला, त्यामुळे पंजाबचे 8 फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत. (Punjab Kings All Out 101)
पंजाबचा संघ आतापर्यंत फलंदाजीत दमदार कामगिरी करत होता, परंतु जोश हेजलवुड आणि सुयश शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य यांच्यासह कोणत्याही फलंदाजाची एक चालली नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. (RCB Bowling Performance)
मुल्लानपूर स्टेडियममध्ये आरसीबीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अत्यंत चांगला सिद्ध झाला. (Royal Challengers Bangalore Win Toss) पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवातच अत्यंत खराब झाली, कारण 27 धावांपर्यंत दोन्ही सलामीचे फलंदाज आपले विकेट गमावून बसले होते. कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल 2025 मध्ये आपल्या फलंदाजीच्या शैलीने आणि कर्णधारपदाने खूप प्रभावित केले आहे, परंतु तो केवळ 2 धावा काढून बाद झाला. (Shreyas Iyer Wicket)
आयपीएल 2025 मध्ये टेबल टॉपर राहिलेल्या पंजाब किंग्जची अवस्था इतकी वाईट झाली की, 50 धावांपर्यंत पंजाबची निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती. साधारणपणे, शशांक सिंग पंजाबसाठी तारणहार ठरत आला आहे, परंतु या वेळी तोही अपयशी ठरला. शशांकच्या बॅटमधून फक्त 3 धावा निघाल्या. आठव्या क्रमांकावर मुशीर खानला संधी मिळाली, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, पण तो खातेही उघडू शकला नाही. (Musheer Khan IPL 2025)