---Advertisement---

RCB vs PBKS: पंजाबचे आरसीबी समोर 158 धावांचे आव्हान! पराभवाचा बदला घेणार RCB?

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ चंदीगढच्या मैदानावर आमने-सामने आहेत. या सामन्याचा टाॅस जिंकून आरसीबीने पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 157 धावा करू शकला. आता मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी आरसीबी 158 धावा करण्यात यशस्वी होतंय की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबसाठी सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 194.12च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 1 षटकार ठोकला. तर शशांक सिंगने नाबाद 31 धावांची खेळी केली. यष्टीरक्षक जोश इंग्लिस 29 धावा करण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर मार्को जॅन्सन 25 आणि प्रियांश आर्य 22 धावा यांच्या जोरावर पंजाबचा संघ 157 धावा करण्यात यशस्वी ठरला.

दुसरीकडे आरसीबीसाठी अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याने 2 आणि फिरकीपटू सुयश शर्माने आपल्या गोलंदाजीची धार दाखवत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर वेगवान गोलंदाज रोमरियो शेफर्डने 1 विकेट घेतली. आता आरसीबीचा संघ 158 धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेयर- देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग

पंजाब किंग्ज- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर- हरप्रीत ब्रार, विजयकुमार विशक, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, प्रवीण दुबे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---