---Advertisement---

RR vs LSG: आवेशची शानदार कामगिरी, विजयानंतर कुटुंब झाले भावूक! VIDEO एकदा पहाच

On: रविवार, एप्रिल 20, 2025 4:24 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (Indian Premier League 2025) 36वा सामना राजस्थान राॅयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) संघात खेळला गेला. दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये आमने-सामने होते. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊने 2 धावांनी शानदार विजय मिळवला. पण या विजयाचा खरा मानकरी ठरला तो लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan). आवेशने लखनऊला शानदार विजय मिळवून दिल्यानंतर त्याचे कुटुंब भावूक झाले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी मात्र 9 धावांची आवश्यकता होती. दरम्यान लखनऊसाठी शेवटचे षटक आवेश खान फेकत होता. आवेशने या सामन्यात त्याचे सर्वोत्तम दिले. त्याने राजस्थानला 9 धावा होऊ दिल्या नाहीत. 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धावा ध्रुव जुरेल स्ट्राईक हेटमायरला दिली. दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने 2 धावा घेतल्या. आता विजयासाठी 6 धावा राहिल्या होत्या. पण आवेशने तिसरा चेंडू याॅर्कर टाकला आणि हेटमायरला शार्दूल ठाकूरच्या हातात झेलबाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी शुभम दुबे मैदानात आला. पण आवेशने दुबेचे स्वागत एक उत्कृष्ट याॅर्करने केले. तो निर्धाव चेंडू राहिला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मिलरने दुबेचा झेल सोडला, तिथे 2 धावा निघाल्या. आता शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती. दरम्यान आवेशने शेवटचा चेंडू देखील याॅर्कर फेकला. तिथे एकच धाव निघाली आणि लखनऊने 2 धावांनी शानदार विजय मिळवला.

आवेशच्या या दमदार गोलंदाजीनंतर त्याला अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. आवेशने लखनऊसाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याला या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर तो आपल्या कुटुंबाशी व्हिडिओ काॅलवर बोलताना दिसला. त्यावेळी त्याच्यासोबत सहकारी खेळाडू निकोलस पूरन होता. फोनवर बोलते वेळी त्याच्या आईचा रडताना आवाज येत आहे. त्यावेळी पूरन आणि आवेश आईला रडू नकोस असं सांगताना दिसत आहेत.

त्याच्यानंतर आवेश आपल्या कुटुंबाला मैदानावर भेटला. तेव्हा त्याचे कुटुंब खूप भावूक झाले होते. त्याची आई रडत होती. दरम्यान आवेशने आपल्या आई वडिलांना कडकडून मिठी मारली याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---