आयपीएल 2025 स्पर्धेतील 22 वा सामना आज (8 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना मुल्लांपूरच्या महाराजा यादविंद्र स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली तसेच चेन्नई ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच चेन्नईला गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
चेन्नईने चार सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवत सलग तीन सामने गमावले आहेत. तसेच पंजाबने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये दोन सामन्यात विजय मिळवलेला आहे. चेन्नईने मागचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गमावला होता. पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स चौथ्या स्थानी तर चेन्नई सुपर किंग्स नवव्या स्थानी आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन:
चेन्नई: रचिन रवींद्र, डेवॉन कॉन्वे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एम एस धोनी, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीषा पथीराना
पंजाब: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉयनीस, नेहाल वडेरा, शशांक सिंग, मार्को यान्सन, युजवेंन्द्र चहल, अर्शदिप सिंग, लकी फर्ग्युसन.