आज (18 एप्रिल) यंदाच्या आयपीएल हंगामातील 34वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात रंगणार आहे. दोन्ही संघ बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने आहेत. दरम्यान आरसीबीचा संघ रजत पाटीदारच्या तर पंजाबचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरताना दिसेल. तत्पूर्वी या सामन्यात पंजाबने टाॅस जिंकला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि यश दयाल
पंजाब किंग्ज- प्रियांश आर्य, नेहल वढेरा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्लेन मॅक्सवेलला वगळण्यात आले आहे. हा सामना 14-14 षटकांचा आहे. 4 गोलंदाज प्रत्येकी 3 षटके टाकू शकतील. एक गोलंदाज दोन षटके टाकेल. या सामन्यात 4 षटकांचा पॉवर प्ले असेल.





