इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे १५ वे हंगाम लवकरच सुरू होणार आहे. हे हंगाम सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये मेगा ऑक्शन सोहळा (ipl mega auction) पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंसह अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सर्व १० संघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. ज्यामध्ये भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनने देखील सहभाग घेतला होता.
गतवर्षी शिखर धवनने (shikhar dhawan) दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिलीज केले होते. दरम्यान आयपीएल २०२२ स्पर्धेत तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. पंजाब किंग्ज संघाने त्याला ८ कोटी २५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी १६ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ३ अर्धशतकांसह ५८७ धावा केल्या होत्या. तसेच आतापर्यंत खेळलेल्या एकूण १९२ सामन्यात त्याने ५७८४ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे
टीम इंडियाचा मालिका विजय; कर्णधार रोहितचा भीम पराक्रम, किंग कोहलीलाही टाकलंय मागे
IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे