---Advertisement---

काहीदिवसांपूर्वी केलेले ‘ते’ ट्विट डिलिट करण्याचा ट्विटरकर्त्यांचा हरप्रीत ब्रारला सल्ला

On: शनिवार, मे 1, 2021 6:41 PM
---Advertisement---

पंजाब किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये नुकत्याच शुक्रवारी (३० एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात पंजाबचा युवा फिरकीपटू हरप्रीत ब्रारने शानदार कामगिरी केली. हरप्रीतने बेंगलोरच्या विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांना बाद करत पंजाबला सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हरप्रीतच्या या शानदार कामगिरीमुळे तो रातोरात स्टार झाला आहे. या दरम्यानच हरप्रीत त्याच्या मैदानावरील कामगिरी सोबतच एका जुन्या ट्विटमुळे देखील चर्चेत आला आहे.

हरप्रीतने 14 फेब्रुवारी रोजी मिया खलिफाच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या होत्या. हरप्रीतच्या या ट्विटवर नेटिझन्सने विनोदी प्रतिक्रिया दिल्या असून त्याला डिलीट करण्याचा सल्लादेखील दिला आहे.

मिया खलिफा काहीदिवसांपूर्वी भारतातील शेतकरी अंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर चर्चेत आली होती.

https://twitter.com/DenofRohit/status/1388159102661005317

https://twitter.com/IzmeArun/status/1388177394553344007

 

हरप्रीतच्या कामगिरीचा विचार केला असता त्याने बेंगलोरविरुद्ध फलंदाजीत 17 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने शानदार 25 धावांची नाबाद खेळी केली. तर गोलंदाजीत 4 षटकात 19 धावा देत 3 गडी बाद केले.हरप्रीतच्या या शानदार कामगिरी बद्दल त्याला सामनावीराच्या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.

दरम्यान, सामन्याचा विचार केला असता येथे पंजाबने बंगलोर विरुद्ध शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पंजाबने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 179 धावांपर्यंत मजल मारली. पंजाब कडून कर्णधार केएल राहुल ने नाबाद 91 तर गेलने 46 धावांची खेळी केली. बँगलोर कडून काईल जेमिसन 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात बँगलोरचा पूर्ण संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावाच करू शकला ,व पंजाबने 34 धावांनी सहज विजय मिळवला. पंजाबकडून या सत्रातील पहिलाच सामना खेळत असलेल्या फिरकीपटू हरप्रीत ब्रारने 3 गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या –

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विमानात किवींसह ऑस्ट्रेलियन खेळाडू पण येणार? ग्लेन मॅक्सवेलने काढलाय भन्नाट उपाय

पंजाब किंग्जने शेअर केला गेल आणि चहलचा शर्टलेस फोटो; नेटिझन्सकडून मीम्सचा सुळसुळाट

आज आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना एकेकाळी रणजी संघात स्थानासाठी करावा लागला होता संघर्ष, प्रशिक्षकांनी केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---