---Advertisement---

रिकी पाँटिंगचे निर्णय पंजाबसाठी ठरतायत चुकीचे? माजी भारतीय खेळाडूचे हेड कोचवर आरोप!

On: रविवार, एप्रिल 27, 2025 4:00 PM
---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्स या हंगामात जोरदार प्रदर्शन करत आहे आणि प्लेऑफमध्ये स्थान बनवण्याच्या अगदी जवळ आहेत. तरीसुद्धा भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू मनोज तिवारी यांनी संघाचे हेड कोच रिकी पॉंटिंग यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, रिकी पॉंटिंग भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवत नाहीत आणि याच कारणाने पंजाब किंग्स या हंगामात ट्रॉफी जिंकू शकणार नाही.

पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये शनिवार (26 एप्रिल) रोजी सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना एक-एक पॉईंट्स देण्यात आला. या सामन्यात पंजाब संघाला प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर पहिली विकेट 120 धावांवर पडली. हे दोघे बाद झाल्यानंतर चौथ्या, पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्को यान्सन यांना पाठवले.

याचा अर्थ असा की, फलंदाजी ऑर्डरमध्ये बदल केल्या कारणाने नेहाल वडेरा आणि शशांक सिंग अशा चांगल्या फलंदाजांना एक चेंडू खेळण्याची सुद्धा संधी मिळाली नाही. तिवारी म्हणाले की, पॉंटिंग यांनी विदेशी फलंदाजांना प्राथमिकता दिली आणि त्या कारणाने भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही. ते म्हणाले, जर ते भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवत नाहीत तर पंजाब संघ या हंगामात ट्रॉफी जिंकू शकणार नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर तिवारी यांनी दावा केला आहे की, रिकी पॉंटिंग यांनी जोश इंग्लिश आणि ग्लेन मॅक्सवेल अशा खेळाडूंना नेहाल वडेरा आणि शशांक सिंग सारख्या भारतीय फलंदाजांआधी पाठवले. ते म्हणाले जर परिस्थिती अशाच प्रकारे राहिली तर पंजाब 2025 मध्ये ट्रॉफी उचलले तर दूरच आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवायला हवा, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---