मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यामुळे कोणत्याही संघासाठी त्यांना पराभूत करणे ही फार मोठी गोष्ट असते. आयपीएल २०२२ मधील २३ वा मुंबई विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामन्यात पंजाबने मुंबईला १२ धावांनी पराभूत केले.
एकवेळ सामना जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या मुंबईला (Mumbai Indians) हंगामातील सलग पाचव्या पराभवाचे तोंड दाखवल्यानंतर पंजाब संघातील (Punjab Kings) खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही प्रचंड आनंद झाला. त्यांनी सामना विजयानंतर या मोठ्या विजयाचा आनंदही साजरा (Punjab Kings Celebration) केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
व्हिडिओत दिसते की, पंजाब संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य ड्रेसिंग रूममध्ये जमा झाले आहेत. पंजाब संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे हातात मोबाईल घेऊन हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंगला सूचना देतात. यावर हे दोघे खेळाडू, पंजाबी… हो… शेर पंजाबी, गाणे गाऊ लागतात. इतर खेळाडूही त्यांना टाळ्यांची साथ देत या ओळी गुणगुणतात.
त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याला तर आनंद इतका अनावर होतो की, ते या गाण्यावर नाचू लागतात. पंजाब संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
Bringing in #Baisakhi on a victorious note! 🎶😍#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #MIvPBKS #HappyBaisakhi pic.twitter.com/qVMQL200fm
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
पंजाबने मुंबईशी साधली बरोबरी
दरम्यान पंजाबने हा सामना जिंकत मुंबईविरुद्ध आयपीएल सामने जिंकण्याच्या आकडेवारीत या संघाशीस बरोबरी साधली आहे. उभय संघातील या सामन्यापूर्वी मुंबई विरुद्ध पंजाब संघात (Mumbai Indians vs Punjab Kings) २७ सामने खेळवण्यात आले आहेत. १४ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले होते. तर पंजाबच्या नावावर १३ विजय होते. मात्र आता पंजाबने मुंबईला पराभूत करत मुंबईशी बरोबरी साधली आहे. हा त्यांचा मुंबईविरुद्ध १४ वा सामना विजय होता.
मयंक अगरवाल ठरला सामनावीर
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद १९८ धावा केल्या होत्या. यात पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालच्या झंझावाती अर्धशतकाचा समावेश होता. त्याने ३२ चेंडू खेळताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांमध्ये ९ बाद १८६ धावाच करू शकला. मयंकला (Mayank Agarwal) त्याच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊ गौरविण्यात आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये दुमदुमतोय फक्त ‘बेबी एबी’चा आवाज; तब्बल ११२ मीटर लांबीचा षटकार मारत बनवला थेट रेकॉर्ड
मोठी बातमी.! आयपीएलच्या धामधुमीत दिग्गज क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
फलंदाजीमुळे सर्वांच्या मनात भरलेल्या तिलक वर्माची पव्हेलियनमध्ये परतताना शिवीगाळ, Video व्हायरल