---Advertisement---

PBKS vs DC: पंजाबच्या खेळाडूंनी हातावर का बांधली काळी पट्टी? नेमकं कारण समोर

On: सोमवार, मे 11, 2026 10:22 PM
---Advertisement---

धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या IPL 2026 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात पंजाब किंग्सच्या (PBKS) खेळाडूंच्या हातावर बांधलेल्या काळ्या फितीने (Black Armband) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेळाडू नक्की काळी पट्टी बांधून का खेळत आहेत, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. आता याचे अत्यंत भावूक कारण समोर आले आहे.

पंजाब किंग्सचे खेळाडू संघाचे फिजिओ अँड्र्यू लेपस यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू लेपस यांच्या आईचे 10 मे रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण संघाने हे पाऊल उचलले आहे.

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पंजाबचा संघ भावूक वातावरणात मैदानात उतरला. सलग तीन पराभवांनंतर पंजाबचा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या दुसऱ्या घरच्या मैदानावर (धर्मशाला) या हंगामाचा हा पहिलाच सामना आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने आपल्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये पाच मोठे बदल केले आहेत. यामध्ये कुलदीप यादवसह पथुम निसंका, नितीश राणा, समीर रिझवी, आशुतोष शर्मा आणि विप्रज निगम यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. लॉकी फर्ग्युसनच्या जागी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज बेन ड्वार्शुइसला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. फर्ग्युसनला किरकोळ दुखापत झाल्यामुळे हा बदल करावा लागल्याचे कर्णधाराने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---