---Advertisement---

PBKS vs SRH: पंजाब किंग्सने हैदराबादला जिंकण्यासाठी दिलं 246 धावांचं आव्हान

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 9:34 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 12 एप्रिल रोजी 27 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स संघात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद वर खेळला जात आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सनरायझर्स हैदराबादला गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत धावा 245 केल्या. तसेच हैदराबादला जिंकण्यासाठी 246 धावांचे आव्हान दिले आहे.

पंजाब किंग्सने फलंदाजी करताना सुरुवात एकदम शानदार प्रकारे केली. प्रियांश आर्य तसेच प्रभसिमरण सिंग यांनी शानदार फलंदाजी केली. प्रियांशने 13 चेंडूत 36 धावा केल्या, त्यामध्ये त्याने 2 चौकार तसेच 4 षटकार ठोकले.
तसेच प्रभसिमरणने 23 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने दरम्यान 7 चौकार तसेच 1 षटकार झळकावला.
कर्णधार श्रेयस अय्यरने तुफानी पारी खेळली. त्याने 36 चेंडूत 82 धावा करत 6 चौकार तसेच 6 षटकार झळकावले. तसेच अंतिम टप्प्यात मार्कस स्टाइनीसने 11 चेंडूत 34 धावा केल्या. त्याने 1 चौकार , 4 षटकार झळकावले.

सनरायझर्स हैदराबादसाठी गोलंदाजी करताना मोहम्मद शमी आज काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्याने चार षटकात एकही विकेट न घेता 75 धावा दिल्या आहेत. हैदराबादसाठी सर्वोत्तम गोलंदाजी हर्षल पटेलने केली, त्याने चार षटकात 42 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या. तसेच ईशान मलिंगाने 2 विकेट्स घेतल्या.

हैदराबादला जिंकण्यासाठी 246 धावांची गरज आहे. हे आव्हान हैदराबाद पूर्ण करू शकेल का? हे पाहणं रंजकतेचे असणार आहे. तसेच हैदराबादसाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---