---Advertisement---

क्रिकेटपटू कम गुरू! सामन्यानंतर शाहरुखने घेतली धोनीची भेट; चाहते म्हणाले, ‘मास्टर माही’

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 12:16 PM
---Advertisement---

एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएल २०२१ चा श्रीगणेशा दारुण पराभवाने झाला. परंतु शुक्रवारी (१६ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्जला ६ विकेट्सने चितपत करत त्यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी हंगामातील पहिला विजय साजरा केला.

शाहरुख खानची एमएस धोनीची गाठभेट
या सामन्यानंतर प्रतिस्पर्धी पंजाब संघाच्या ‘पावर हिटर’ शाहरुख खान याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीच्या फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणले आहे.

चेन्नईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबकडून एकाकी झुंज देणारा शाहरुख यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलच्या रणागणांत उतरला आहे. अशात या २५ वर्षीय नवोदित शिलेदाराला धोनीची गाठभेट घेण्याची संधी त्याने हातून जाऊ दिली नाही. सामना झाल्यानंतर त्वरित त्याने धोनीला गाठले आणि त्याच्याशी काही विषयांवर संवाद साधला.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1383118929548046340?s=20

चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनी-शाहरुखच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हा फोटोवरुन धोनीला ‘मास्टर’ असे संबोधले आहे.

https://twitter.com/Saiganeshbunny1/status/1383119498199199746?s=20

https://twitter.com/HariTweetz77/status/1383119808607113221?s=20

https://twitter.com/AdityaS_Indian/status/1383120955237490691?s=20

https://twitter.com/SanjayNaidu_/status/1383119077586001924?s=20

https://twitter.com/iaziz07/status/1383119048712413190?s=20

https://twitter.com/Arjunn9999/status/1383145109441499136?s=20

https://twitter.com/NaniNobitha/status/1383119973422403585?s=20

https://twitter.com/iGOURAV13/status/1383120228863729664?s=20

एखाद्या युवा खेळाडूने धोनीकडून मार्गदर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी बऱ्याचदा युवा क्रिकेटपटू सामन्यापुर्वी किंवा सामन्यानंतर स्वत: धोनीकडे त्याची भेट घेत असल्याचे प्रसंग आपण पाहिले आहेत.

संघाला पार करुन दिली धावांची शंभरी
दरम्यान पंजाब किंग्जचा युवा शिलेदार शाहरुखच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, त्याने या सामन्यात पंजाबकडून सर्वाधिक धावा चोपल्या. १३ व्या षटकापर्यंत संघ ६ बाद ५७ धावा अशा स्थितीत असताना त्याने आक्रमक पवित्रा घेतला. ३६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार खेचत त्याने ४७ धावा केल्या आणि संघाला धावांनी शंभरी पार करुन दिली. अखेर १९. १ चेंडूत सॅम करनच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो रविंद्र जडेजाच्या हाती झेल देऊन बसला आणि पव्हेलियनला परतला.

महत्त्वाच्या बातम्या-

सामना सुरू असताना धोनीने शाहरुखच्या कानात काय सांगितले होते? खुद्द ‘थाला’नेच केला खुलासा

CSKvPBKS: कोण आहेत हे माय-लेक, ज्यांनी लाखो सामना दर्शकांचे वेधले लक्ष? घ्या जाणून

‘कर्णधार माझ्या पाठीशी, म्हणूनचं चांगली कामगिरी करु शकलो,’ सामनावीर चहरचे मनाला भावणारे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---