सोमवारी (दि. 8 मे) कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघात आयपीएल 2023चा 53वा सामना खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा कर्णधार शिखर धवन याने खास विक्रम नावावर केला. वयाच्या 37व्या वर्षी धवनने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. चला तर धवनने नेमका विक्रम केलाय तरी काय हे जाणून घेऊयात…
झाले असे की, या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पंजाबकडून डावाची सुरुवात करण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि धवन मैदानावर उतरले होते. यावेळी पंजाबने प्रभसिमरनच्या रूपात दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर 21 धावांवर पहिली विकेट गमावली. मात्र, शिखर धवन याने टिच्चून फलंदाजी करत खास पराक्रम गाजवला.
शिखर धवनचा विक्रम
शिखर धवन याने सामन्यात 47 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 9 चौकारांचाही समावेश होता. ही खेळी करताना त्याने टी20 कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला.
शिखर धवनची स्पर्धेतील कामगिरी
शिखर धवन याच्या आयपीएल 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी 8 सामने खेळताना 67.80च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये धवनची सर्वोच्च धावसंख्या ही 99 इतकी राहिली आहे. धवनने या धावा करताना 47 चौकार आणि 9 षटकारही मारले आहेत.
पंजाब किंग्स गुणतालिकेत सातव्या स्थानी
गुणतालिकेत सातव्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्स संघाने हंगामात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यापैकी 5 सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे, तर उर्वरित 5 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. आता कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला, तर ते कदाचित गुणतालिकेत तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी जाऊ शकतात. कारण, पंजाबचे आता 10 गुण आहेत. तसेच, पहिले 3 संघ सोडले, तर इतर सर्व संघांचे 10 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जिंकल्यानंतर गुणांच्या आधारे पंजाब संघ तिसरे किंवा चौथे स्थान पटकावू शकतो. (punjab kings Shikhar Dhawan completes 1000 runs as T20 captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जलवा है हमारा यहां! वानखेडेतील विराटचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘विषये का’
कमबॅक करण्यासाठी पंजाब अन् कोलकाता IPLच्या 53व्या सामन्यात आमने-सामने, टॉस जिंकून ‘किंग्स’ची बॅटिंग