---Advertisement---

PBKS vs RR: पंजाब किंग्सने टॉस जिंकला, राजस्थानला दिले फलंदाजीचे आमंत्रण

On: शनिवार, एप्रिल 5, 2025 7:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील अठरावा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स दोन्ही संघात खेळला जाणार आहे. हा सामना महाराजा यादविंन्द्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाणार आहे. पंजाब किंग्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली तर राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळताना दिसेल. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजस्थान रॉयलला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.

राजस्थानसाठी आनंदाची बातमी आहे की संजू सॅमसनने पुनरागमन केले आहे. आज तो खेळताना दिसणार आहे.
पंजाब किंग्स मुल्लांपूर स्टेडियमवर एकूण चार सामने खेळणार आहे. पंजाब किंग्सने आत्तापर्यंत स्पर्धेत दोन विजय मिळवले आहेत. तसेच राजस्थानची सुरुवात थोडी बरी झाली आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन:-

पंजाब: – श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरण सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टायनिश, नेहाल वडेरा, शशांक सिंग, सूर्यांश शेंडगे, मार्को मान्सून, अर्शदीप सिंग, लकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल

राजस्थान:- संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, सिमरन हेटमायर, वानिंदू हसरांगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, युद्धवीर सिंग, संदीप शर्मा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---