आज रॉयल चॅलेंन्जर बेंगलोरचा तिसरा सामना किंग्स ११ पंजाबशी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर होणार असून दोन्ही संघानी आपल्या मागील सामन्यात विजय मिळविला आहे. दोनही संघ चांगले लयीत असून दोनही संघांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. पंजाबला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल असे दिसून येते कारण मागील शनिवारी त्यानी याच मैदानावर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पुण्याच्या संघालाही मात दिली आहे.
बेंगलोरचा संघ आपल्या प्रमुख खेळाडूनशिवाय खेळात आहे, भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली जो की बंगलोरचा कर्णधारही आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा ए बी डीव्हिलर्स हे दोनही खेळाडू याही सामन्याला मुकणार आहे असे दिसून येत आहे . आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मागील सामन्यात चांगला खेळ करून बेंगलोरच्या संघाने दिल्लीच्या संघाला १५ धावांनी मात दिली होती. तसेच पुण्याविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेल-मिलर या जोडीने चांगली खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला होता.
आता पर्यंतच्या झालेल्या १८ सामन्यात १० वेळा पंजाबने तर ८ वेळा बेंगलोरने विजय मिळवला आहे .