भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत हाँग काँगच्या चेउन्ग यी विरुद्धच्या सामन्यात १९-२१, २३-२१, २१-१७ असा विजय मिळवत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्र घेतला. सेट ५-५ असा बरोबरीत होता. सामन्यात ब्रेक झाला तेव्हा सिंधू ९-११ अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिने सामन्यात परत येत सामना १५-१५ असा बरोबरीत आणला. कोणत्याही खेळाडूला सलग तीन गुण मिळवता आले नाहीत हा सेट इतका आटातटीचा होत होता. हा सेट सिंधूने १९-२१ असा गमावला.
दुसऱ्या सेटमध्ये पी.व्ही.सिंधूने आक्रमक खेळ करत ४-० अशी बढत मिळवली. तिने ही आघाडी ६-३ अशी वाढवली. आपल्या खेळावर नियंत्रण ठेवत तिने आघाडी ८-४ अशी पुढे नेली. त्यानंतर हाँग काँगच्या खेळाडूने सामन्यात परतून आघाडी ११-१० अशी मिळवली. त्यानंतर सिंधू १४-१६ अशी पिछाडीवर पडली. सलग तीन गुण मिळवत सिंधूने हा सामना १७-१६ असा केला. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत सामना २०-२० अश्या बरोबरीत नेऊन ठेवला. हा सेट ट्रायब्रेकरवर येऊन ठेपला असता हा सेट सिंधूने २३-२१ असा जिंकला. हा सेट जिंकल्यानेसिंधू या सामन्यात टिकून राहिली.
तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने चेउन्ग यीला जास्त संधी न देता हा सेट २१-१७ असा जिंकत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
After 87 minutes of rigorous badminton, PV Sindhu comes out on top.
Defeats Cheung Ngan Yi 19-21, 23-21, 21-17. #2017BWC quarters calling! pic.twitter.com/BRDKlVWLCD
— BAI Media (@BAI_Media) August 24, 2017