काल भारताच्या पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीमध्ये रौप्यपदकाची कामगिरी केली. याबरोबर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ३ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली.
याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकून साइना नेहवालने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत २ पदके जिंकली. यात २०१५ साली रौप्यपदक तर २०१७ साली कांस्यपदक जिंकले आहे.
भारतीय खेळाडूंनी यापूर्वी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगीरी केली आहे. भारताच्या नावावर १९८३ सालापासून ते २०१६ पर्यंत ७ पदके आहेत.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडे आता पुरुष एकेरीमध्ये एक, महिला दुहेरीमध्ये एक आणि महिला एकेरीमध्ये चार अशी एकूण सात पदके आहेत.
भारताची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील कामगिरी:
पीव्ही सिंधू (२०१३ – कांस्यपदक, २०१४ – कांस्यपदक, २०१७ – रौप्यपदक)
साइना नेहवाल (२०१५ – रौप्यपदक, २०१७ – कांस्यपदक)
अश्विनी पोनप्पा- ज्वाला गुट्टा (२०११ – कांस्यपदक)
प्रकाश पदुकोण (१९८३ – कांस्यपदक)