भारताचे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि एचएस प्रणोय मलेशिया मास्टर्स २०२२च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले. त्यातील सिंधूचा सामना आज (८ जुलै) चायनीय तेपैईच्या ताय त्झू यिंग हिच्याशी झाला. मलेशिया ओपनमधून बाहेर पडल्यानंतर भारताला या स्पर्धेतून सिंधूकडून अपेक्षा होत्या. मात्र या स्पर्धेतही भारताची निराशा झाली आहे. यिंगने सिंधूचा २१-१३, १२-२१, २१-१२ असा पराभव केला आहे. यामुळे भारताच्या आशा आता फक्त प्रणॉय याच्यावर आहेत.
दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने या सामन्यात पहिला गुण जिंकत उत्तम सुरूवात केली होती. मात्र नंतर सिंधूने केलेल्या चुकांचा यिंगला फायदा झाला. पहिला सेट यिंगने २१-१३ असा सहज जिंकला. सिंधूने हार न मानता पुन्हा एकदा आपला खेळ उंचावत दुसरा सेट १२-२१ अशा फरकाने जिंकला.
सिंधू आणि यिंग दोघीही एक-एक सेट जिंकल्याने तिसरा सेट चुरशीचा होणार होता. मात्र सिंधूची यिंगविरुद्ध मागील कामगिरी पाहता या सामन्यातही यिंगच वरचढ ठरली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला यिंगनेच सिंधूला मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर काढले. यिंगविरुद्ध सिंधूची झुंज अनेकदा कमी पडली आहे. आतापर्यंत या दोघी १७ वेळा आमनेसामने आल्या असून मागील सातही सामने यिंगने जिंकले आहेत. सिंधूला यातील पाचच सामने जिंकता आले आहे.
PERODUA Malaysia Masters 2022
WS – Quarter final
21 12 21 Tzu Ying TAI🏅
13 21 12 🇮🇳V. Sindhu PUSARLA🕗 in 55 minutes
https://t.co/0lX4OKvau6— BWFScore (@BWFScore) July 8, 2022
या सामन्याआधी सिंधूचा यिंगविरुद्ध ५-१६ असा निराशाजनक रेकॉर्ड होता. तिने यिंगला २०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पराभूत केले होते. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर मात्र तिने यिंगला हरवलेले नाही. ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यिंगने सिंधूला हरवले होते. यामुळे तिला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सहा-सात महिन्यांत भारताने पाहिलेत ५ कर्णधार, नकोशा गोष्टीचं श्रेय जात ‘या’ खेळाडूला
आख्ख्या वनडे कारकीर्दीत एकही षटकार मारू न शकलेले ‘हे’ आहेत कमनशिबी क्रिकेटर
दुर्देवाची परिसीमा! एका मॅचच्या पुढे गेले नाही ‘या’ भारतीय क्रिकेटर्सचे इंटरनॅशनल करिअर