नुकतेच बर्मिंघम, इंग्लंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या बॅडमिंटनपटूंनी या स्पर्धेत एकूण ६ पदके जिंकली आहेत. त्यामध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकले. फॉर्ममध्ये असेल्या सिंधूने आगामी बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून (BWF World Championship) माघार घेतली आहे.
पी व्ही सिंधू (PVSindhu) हिने ट्विटरमार्फत बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचे कळविले आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले, “मी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या आनंदात होते. अशातच मला वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून बाहेर व्हावे लागत आहे. मला कॉमनवेल्थ गेम्सच्या उपांत्यपूर्व फेरीत दुखापत झाली होती, पण माझ्या प्रशिक्षक, फिजीयो आणि ट्रेनर यांच्या मदतीने मी पुढे चांगला खेळ केला.”
“दुखापत इतकी गंभीर होती की मला अंतिम सामन्यात त्याचा त्रास होत होता. मी हैद्राबादमध्ये आल्यावर लगेच एमआरआय स्कॅन केला. त्याचा रिपोर्ट्स आल्यावर माझ्या डाव्या पायला फ्रॅक्चर असल्याचे काळाले. त्यामुळे मला डॉक्टरांनी विश्रांती सांगितली आहे,” असेही सिंधूने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
— Pvsindhu (@Pvsindhu1) August 13, 2022
बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीप ही स्पर्धा २१ ते २८ ऑगस्टपासून जपान, टोकीयोमध्ये खेळली जाणार आहे.
सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या महिला एकेरीत एकूण पाच पदके जिंकली आहेत. तिने २०१९मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच तिने दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकेही जिंकली आहेत.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये दुखापतीचा सामना करत जिंकले सुवर्ण
सिंधूने दुखापतग्रस्त असताना कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल ली हीचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. हे तिचे कॉमनवेल्थ गेम्सचे दुसरे सुवर्ण पदक ठरले आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या एकेरीत सुवर्ण पदक जिंकणारी सिंंधू केवळ दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. तिच्याआधी सायना नेहवालने २०१० आणि २०१८ महिला एकेरीचे सुवर्ण पदक जिंकले होते.
तसेच सिंधूने २०१८ आणि २०१४ मध्ये महिला एकेरीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकले होते. तसेच २०१८च्या स्पर्धेत मिश्र संघात सुवर्णपदक जिंकले. २७ वर्षीय सिंधूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. तिने २०१६मध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष | एक अस्सल मुंबईकर, ज्याने प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलं नाव
Best Catch | ‘या’ खेळाडूने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, पाहा व्हिडिओ
दिग्गज ठामपणे म्हणतोय, “कसोटी क्रिकेटच अस्तित्व संपणार नाही!”