जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानी खेळाडू नोजोमी ओकुहरा हिने भारताच्या पी.व्ही.सिंधूचे कडवे आव्हान २१-१९, २०-२२,२२-२० असे मोडीत काढत सुवर्ण पदक पटकावले. नोजोमी ओकुहरा ही जपानसाठी महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीवहिली खेळाडू ठरली आहे. अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक गुणांसाठी दोन्ही खेळाडूंनी केलेली पराकाष्टा या अंतिम सामन्याचे वैशिष्टय ठरले.
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू ५-५ असे बरोबरीत होते . त्यानंतर सिंधूने या सेटमध्ये सलग सलग गुण मिळवत ११-५ अशी बढत घेतली. या सेटमध्ये सिंधू निर्विवाद वर्चस्व गाजवणार असे वाटत असताना ओकुहराने कडवा प्रतिकार करत सिंधूवर १६-१३ अशी आघाडी मिळवली. दोन्ही खेळाडू १९-१९ अश्या स्थितीत होते परंतु जपानी खेळाडूने हा सेट २१-१९ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या काही मिनिटात सिंधूने ६-३ अशी बाधत मिळवली. ओकुहराने लॉन्ग रॅलीजचा खेळ करत सामन्यात परतण्याचे संकेत दिले. जेव्हा सामन्यात ब्रेक दिला गेला तेव्हा सिंधू ११-९ अशी आघाडीवर होती. दोन्ही खेळाडू २०-२० अश्या स्थितीत आले. तेव्हा सिंधूने लॉन्ग रॅली जिंकत सामन्यात २१-२० अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर हा सेट २२-२० असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये ओकुहरा ४-१ अशी आघाडीवर होती. सिंधूने सलग ४ गुण मिळवत हा सेट ५-५ असा बरोबरीत आणला. जेव्हा या सेटमध्ये ब्रेक मिळाला तेव्हा सिंधु ११-९ अशी आघाडीवर होती. त्यानंतर दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या रॅलीजचा जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानी खेळाडू नोजोमी ओकुहरा हिने भारताच्या पी.व्ही.सिंधूचे कडवे आव्हान २१-१९, २०-२२,२२-२० असे मोडीत काढत सुवर्ण पदक पटकावले.
नोजोमी ओकुहरा ही जपानसाठी महिला एकेरीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीवहिली खेळाडू ठरली आहे. अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक गुणांसाठी दोन्ही खेळाडूंनी केलेली पराकाष्टा या अंतिम सामन्याचेवैशिष्ट्य ठरले.
सिंधूने केलेल्या जिगरबाज खेळाचे सर्व स्थरांवरून कौतुक होत आहे. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी दोन पदके कामवाली. पी.व्ही.सिंधूने रौप्य पदक तर साईना नेहवालने कांस्य पदक मिळवले.