राष्ट्रपती भवनात सोमवारी (८ नोव्हेंबर) देशभरातील विविध क्षेत्रातील १४१ लोकांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये बॅडमिंटनपटू पीवी सिंधूचाही समावेश होता. सिंधूला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळण्याच्या काही वेळ आधी तिने स्वतःचा डान्स करतानाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ वेगात व्हायरल झाला आहे.
सिंधूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर प्रचंड वेगाने वायरल झाला आहे. हा व्हिडिओ सिंधूने ‘love nwantiti’ या गाण्यावर बनवला आहे. व्हिडीओत सिंधूने एक सुंदर अस लेहंगा परिधान केला आहे, जो तिला अधिकच शोभून दिसत आहे.
सिंधूने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून दिवाळी पोस्टच्या सिरीजमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका दिवसात त्याला तब्बल ४ लाख लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी सिंधूच्या या व्हिडिओचे कौतुक केले आहे. अनेक चाहते तिच्या या पोस्टवर कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत.
https://www.instagram.com/p/CV-HAB7gmZN/
सोमवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात पीव्ही सिंधू देखील उपस्थित होती. यावेळी तिला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सिंधूने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ती पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली की, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्कारासाठी मी भारत सरकार, सर्व मंत्री आणि राष्ट्रपती महोदयांची आभारी आहे. मी खूप आनंदी आहे. येणाऱ्या भविष्यात अजून चांगली कामगिरी करण्यासाठी अशाप्रकारचे पुरस्कार खूप प्रोत्साहन, समर्थन आणि प्रेरणा देतात.”
दरम्यान, सिंधूने भारतासाठी आतापर्यंत दोन ऑलिंपिक पदक जिंकले आहेत. यामध्ये तिच्या एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढतीने केला मोठा रेकॉर्ड; तब्बल ‘एवढ्या’ लोकांनी पाहिला सामना