भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे २०१८ मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याचे स्वप्न आहे. सातत्यपूर्ण कामगिरीतून मी हे स्थान मिळवीन असे असे तिचे म्हणणे आहे.
सिंधूच्या कारकिर्दीतील सर्वात चांगली कामगिरी म्हणजे सिंधूने २ महिने १५ दिवसात जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले होते. तर २०१६च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक पटकविले होते.
” आगामी मोसमात मी स्वतःला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पाहत आहे. मी सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. मी जर चांगले खेळले तर माझी क्रमवारी आपोआप वाढेल त्यामुळे मी क्रमवारीविषयी अजिबात विचार करत नसून मला फक्त चांगले खेळायचे आहे. माझ्या चांगल्या खेळण्यामुळे माझ्या कामगिरीत आपोआप वाढ होईल.” असे सिंधू म्हणाली.
सिंधू सध्या सुरु असलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेमध्ये चेन्नई स्मॅशर्स संघाकडून खेळत आहे. या संघाची ती कर्णधार असून तिचा मागील सामना मुंबई रॉकेट्स संघाबरोबर होता. हा सामना तिने २-१ अश्या फरकाने जिंकला.