fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी अ संघाला विजेतेपद

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पीवायसी अ संघाने पीवायसी क संघाचा 18-17असा संघर्षपुर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पीवायसी अ संघाने पीवायसी क संघाचा 18-17 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

सामन्यात 90अधिक गटात पीवायसी अ संघाच्या डॉ.राजेंद्र साठे वअमित लाटे यांना पीवायसी क संघाच्या सुंदर अय्यर व अमित नाटेकर यांनी टायब्रेकमध्ये 5-6(4-7)असे पराभुत करून संघाला सुरेख सुरूवात करून दिली.

खुल्या दुहेरी गटात पीवायसी क संघाच्या ध्रुव मेड व वरूण मांगीकर यांनी पीवायसी अ संघाच्या ऋतु कुलकर्णी व सारंग देवी यांचा 6-1असा सहज पराभव करून संघाची आघाडी 12-6ने वाढविली. त्यानंतर खुल्या दुहेरी गटात पीवायसी अ संघाच्या अभिषेक ताम्हाणे व मिहिर दिवेकर यांनी पीवायसी क संघाच्या अर्जुन चितळे व सारंग पाबळकर या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला 15-12अशी स्थिती निर्माण करून दिली. अतितटीच्या व निर्णायक लढतीत 110अधिक गटात पीवायसी अ संघाच्या हिमांशू गोसावीने डॉ.अभय जमेनिसच्या साथीत पीवायसी क संघाच्या सत्यमुर्ती रामास्वामी व अनुप मिंडा यांचा 6-2 असा एकतर्फी पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तिसर्‍या व चौथ्या क‘मांकासाठी झालेल्या लढतीत शितल भोसले, डॉ.दिनेश शिंगटे, किरण कुलकर्णी, श्रीकांत कुमावत यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर जिल्हा अ संघाने सीसीआय अ 20-16असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला 75हजार रूपये, तर उपविजेत्या पीवायसी क संघाला 50 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय तिसर्‍या क्रमांक पटकावणार्‍या जिल्हा अ संघाला 25हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, स्पर्धेचे संचालक शरद कन्नमवार आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः

पीवायसी अ वि.वि.पीवायसी क 18-17(110अधिक गटः हिमांशू गोसावी/डॉ.अभय जमेनिस वि.वि.सत्यमुर्ती रामास्वामी/अनुप मिंडा 6-2; खुला दुहेरी गटः अभिषेक ताम्हाणे/मिहिर दिवेकर वि.वि.अर्जुन चितळे/सारंग पाबळकर 6-3; 90अधिक गटः डॉ.राजेंद्र साठे/अमित लाटे पराभुत वि.सुंदर अय्यर/अमित नाटेकर 5-6(4-7); खुला दुहेरी गटः ऋतु कुलकर्णी/सारंग देवी पराभुत वि.ध्रुव मेड/वरूण मांगीकर 1-6);

3र्‍या व 4थ्या क्रमांकासाठीः
जिल्हा अ संघ वि.वि.सीसीआय अ 20-16(110अधिक गटः शितल भोसले/डॉ.दिनेश शिंगटे वि.वि.ब्रिन्दा दयाल/सागर इंजिनियर 6-3; खुला दुहेरी गटः किरण कुलकर्णी/श्रीकांत कुमावत वि.वि.जयेश संपत/निखिल संपत 6-1; 90अधिक गटः डॉ.अक्रम खान/विजय मेहर पराभुत वि.विक्रम संपत/लव कोठारी 3-6; खुला दुहेरी गटः निलेश सावंत/मेहुल केनिया पराभुत वि.इम्रान युसुफ/प्रसाद प्रधान 5-6(5-7).

You might also like