पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी इगल्स, डेक्कन अ, फर्ग्युसन कॉलेज अ, महाराष्ट्र मंडळ, सोलारिस आरपीटीए या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात चकोर गांधी, मिलिंद केळकर, संतोष कटारिया, मोहन भंडानी, लक्ष्मीकांत चोभे, प्रकाश चंडोकर, सतीश भगत, राहुल गांगल यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी इगल्स संघाने सोलारिस क संघाचा 24 -9असा पराभव करून शानदार सुरुवात केली. डेक्कन अ संघाने एमडब्लूटीए क संघाचा 24-3असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अजय कामत, अमित पाटणकर, मंदार वाकणकर, ह्रिषीकेश पाटसकर, जयदीप दाते, मदन गोखले, संग्राम चाफेकर, विक्रांत साने यांनी अफलातून कामगिरी केली. फर्ग्युसन कॉलेज अ संघाने विनिंग एज ब संघाचा 24-6 असा तर, महाराष्ट्र मंडळ संघाने विनिंग एज अ संघाचा 19-13असा संघर्षपूर्ण पराभव केला. सोलारिस आरपीटीए संघाने विनिंग एज क संघावर 24 -3असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी इगल्स वि.वि.सोलारिस क 24 -9(100अधिक गट: चकोर गांधी/मिलिंद केळकर वि.वि.रवी भोंडेकर/संभाजी शिंदे 6-4; खुला गट: संतोष कटारिया/मोहन भंडानी वि.वि. मंदार काळे/हेमंत निकम 6-1; 90अधिक गट: लक्ष्मीकांत चोभे/प्रकाश चंडोकर वि.वि.राजेंद्र पवार/संजय अगरवाल 6-4; खुला गट: सतीश भगत/राहुल गांगल वि.वि.संतोष साटम/श्रीकांत पवार 6-0;
डेक्कन अ वि.वि.एमडब्लूटीए क 24-3(100अधिक गट: अजय कामत/अमित पाटणकर वि.वि.रिझवान शेख/राम मोहन एस 6-0; खुला गट: मंदार वाकणकर/ह्रिषीकेश पाटसकर वि.वि.पार्थ एम/विक्रम गोलाणी 6-2; 90अधिक गट: जयदीप दाते/मदन गोखले वि.वि.संजय आशर/राहुल सिंह 6-1; खुला गट: संग्राम चाफेकर/विक्रांत साने वि.वि.अंकित दोगा/रिझवान शेख 6-0;
फर्ग्युसन कॉलेज अ वि.वि.विनिंग एज ब 24-6(100अधिक गट: पुष्कर पेशवा/राजीव जोशी वि.वि.शशी जोशी/शैलेश हियोगी 6-4;खुला गट: सचिन साळुंके/गणेश देवखिळे वि.वि.बाळासाहेब पवार/विठ्ठल गोर्डे 6-2; 90अधिक गट: शंभू तावरे/पंकज यादव वि.वि.सचिन फामसलकर/अजय आपटे 6-0; खुला गट: सुमित सातोस्कर/आदित्य अभ्यंकर वि.वि.सचिन कुलकर्णी/सुनील आहिरे 6-0);
महाराष्ट्र मंडळ वि.वि.विनिंग एज अ 19-13(100अधिक गट: संजय सेठी/हरीश सिरीपाल पराभूत वि.उदय टेकाळे/निलेश नाफडे 1-6;खुला गट: अभिषेक चव्हाण/विक्रम शिरिशमळ वि.वि.गंगा प्रसाद/अविनाश पवार 6-3; 90अधिक गट: कमलेश शहा/विलास बचलू वि.वि.मंदार कापशीकर/मुकेश देशपांडे 6-3;खुला गट: संजय सेठी/अर्पित श्रॉफ वि.वि.आदित्य टेकाळे/आशुतोष सोवनी 6-1);
सोलारिस आरपीटीए वि.वि.विनिंग एज क 24 -3(100अधिक गट: संजीव घोलप/राजेंद्र देशमुख वि.वि.जय कुलकर्णी/मनीष कोठवकर 6-3; खुला गट: सिंधू भरमगोंडे/हेमंत भोसले वि.वि.गुरुराज के./मंदार नगरकर 6-0; 90अधिक गट: रवी कात्रे/सचिन खिलारे वि.वि.प्रशांत के./साकेत वेलसीन 6-0; खुला गट: रवी पांडे/संजीव घोलप वि.वि.मनीष के./राहुल उप्पल 6-0)