पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात हरी सावंत(6-52) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाने मेट्रो क्रिकेट क्लब संघाला 230 धावांवर रोखले.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत तीन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी(२३ नोव्हेंबर) मेट्रो क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50.5 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या. सलामीची जोडी संकीत पांडेने 54 चेंडूत 9 चौकारांसह 45 धावा व ओम आगाडे(24धावा) यांनी पहिल्या विकेटकरीता 89 चेंडूत 65 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर यश बारगेने 53 चेंडूत 11 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 58 धावांची संयमी खेळी केली. यशला निशांत नगरकरने 25 धावा काढून साथ दिली. या दोघांनी 88 चेंडूत 64धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
हे दोघेही बाद झाल्यावर गुरुवीर सिंग सैनीने 37 धावा, प्रशामने 28 धावा केल्या. आर्यन्स क्रिकेट अकादमीकडून डावखुरा फिरकी गोलंदाज हरी सावंतने 13.5 षटकात 52 धावात 6 महत्वपूर्ण गडी बाद करून मेट्रो क्रिकेट क्लबचा निम्मा संघ तंबूत परत पाठवला. हरीला सुशील बूरले(41-2), सागर होगाडे(35-1), निलय नेवसकर(41-1) यांनी सुरेख गोलंदाजी करत साथ दिली. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट अकादमी संघ 31.1षटकात 5बाद 134धावा असा सुस्थितीत आहे. यात तेजस तोलसणकर नाबाद 43 धावा, हार्दिक कुरंगुळे नाबाद 2 धावांवर खेळत आहे. मेट्रो क्रिकेट क्लबकडून रेहान खान (36-2), संकीत पांडे (15-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
डेक्कन जिमखाना मैदानावरील सामन्याला सोमवारी झालेल्या पावसामुळे खेळपट्टी ओली असल्यामुळे पंचानी दुपारी वाजता सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. नॉर्थ झोन संघाने पहिल्यांदा खेळताना आज दिवसअखेर 38 षटकात 1बाद 102 धावा केल्या. यामध्ये मुकेश जट नाबाद 47धावा, प्रसन्न निळे नाबाद 33 धावांवर खेळत आहे. दोन्ही अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
निकाल: दुसरा दिवस: पीवायसी मैदान: पहिला डाव: मेट्रो क्रिकेट क्लब: 50.5 षटकात सर्वबाद 230 धावा(यश बारगे 58(53,11×4,1×6), संकीत पांडे 45(54,9×4), गुरुवीर सिंग सैनी 37(45,4×4,2×6), प्रशाम 28(28), निशांत नगरकर 25(50), ओम आगाडे 24, हरी सावंत 13.5-52-6, सुशील बूरले 9-41-2, सागर होगाडे 5-35-1, निलय नेवसकर 9-41-1) वि.आर्यन्स क्रिकेट अकादमी: 31.1षटकात 5बाद 134धावा(तेजस तोलसणकर नाबाद 43(77,7×4), प्रमोद नारले 24, हरी सावंत 18, अमन मुल्ला 18, हार्दिक कुरंगुळे नाबाद 2, रेहान खान 5-36-2, संकीत पांडे 7.1-15-2);
डेक्कन जिमखाना मैदान: पहिला डाव: नॉर्थ झोन: 38षटकात 1बाद 102धावा(मुकेश जट नाबाद 47(120,7×4), प्रसन्न निळे नाबाद 33(96,5×4), साहिल गाईकर 18, आयुष काब्रा 1-21) वि.डेक्कन जिमखाना