पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एनएच वुल्वस, डी लिंक चिताज, गोल्डफिल्ड डॉल्फिन्स, टायगर्स, ओव्हन फ्रेश टस्कर्स, ट्रूस्पेस जॅगवॉर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात रवी कासटच्या फटकेबाज फलंदाजीच्या जोरावर ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने डी लिंक चिताज् संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कृष्णा मेहताच्या नाबाद 41 धावांच्या बळावर डी लिंक चिताज् संघाने 6 षटकात 2 बाद 77 धावा केल्या. 77 धावांचे लक्ष रवी कासटच्या जलद 48 धावासह ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 4 चेंडू राखत 4 बाद 80 धावांसह पुर्ण केले. रवीने 18 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह 48 धावा केल्या. नकुल पटेलने 19 धावा करून रवीला सुरेख साथ दिली. रवी कासट सामनावीर ठरला.
अन्य लढतीत प्रसाद जाधव याच्या नाबाद 52धावांच्या खेळीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने गुडलक हॉग्स लिमये संघावर 14धावांनी विजय मिळवला. आत्मन बागमार(नाबाद 33 व 1-10)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डी लिंक चिताज संघाने गोखले सिनर्जी कोब्राज संघावर 7गडी राखून विजय मिळवला. गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने जीएससी पँथर्सवर 13धावांनी विजय मिळवत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डी लिंक चिताज्- 6 षटकात 2 बाद 77 धावा(कृष्णा मेहता नाबाद 41, अक्षय ओक 20, अनुज मेहता 1-21, निरंजन गोडबोले 1-6) पराभूत वि ट्रूस्पेस जॅगवॉर्स- 5.2 षटकात 4 बाद 80 धावा(रवी कासट 48(18), नकुल पटेल 18, राहूल पंडीत 1-19, जयकांत वैद्य 1-17, आत्मन बागमार 1-10) सामनावीर- रवी कासट; ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.
एनएच वुल्वस: 6षटकात 2बाद 86धावा(प्रसाद जाधव नाबाद 52, अनुज लोहाडे 18, प्रशांत वैद्य 12, सिद्धांत चोपडा 1-8)वि.वि.गुडलक हॉग्स लिमये: 6षटकात 2बावडा 72धावा(देवेंद्र चितळे नाबाद 33, समीर जोग 23, अनुज लोहाडे 1-4);सामनावीर-प्रसाद जाधव; एनएच वुल्वस 14धावांनी विजय;
गोखले सिनर्जी कोब्राज: 6षटकात बाद 60धावा(विमल हंसराज 12, विशाल गोखले 18, ईशान भाले 18, आत्मन बागमार 1-10, कृष्णा मेहता 1-11) पराभूत वि.डी लिंक चिताज: 4.4षटकात 1बाद 61धावा(आत्मन बागमार नाबाद 33, अक्षय ओक नाबाद 22, विमल हंसराज 1-11);सामनावीर-आत्मन बागमार; डी लिंक चिताज 7गडी राखून विजयी;
गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6षटकात 1बाद 79धावा(रोहन छाजेड नाबाद 33, अश्विन शहा 24, आशुतोष आगाशे 17, कर्णा मेहता 1-6)वि.वि.जीएससी पँथर्स: 6षटकात 6बाद 66धावा(कर्णा मेहता 27, यश परांजपे 12, दीपक लुनावत 11, रोहन छाजेड 2-10, सिद्धार्थ अंबर्डेकर 1-13, अभिजित भाटे 1-6, नचिकेत जोशी 1-9, अनिल छाजेड 1-12);सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन्स 13धावांनी विजयी;
टायगर्स: 6षटकात 5बाद 61धावा(अभिषेक ताम्हाणे 26, अमित कुलकर्णी 25, रोहित बर्वे 2-3, आशिष देसाई 1-5, हर्षद बर्वे 1-6)वि.वि.आर स्टॅलियन्स: 6षटकात 4बाद 49धावा(रोहित बर्वे 15, हर्षद बर्वे 10, सिद्धार्थसाठ्ये 2-9, अमित कुलकर्णी 1-6, चेतन वोरा 1-13);सामनावीर-अमित कुलकर्णी; टायगर्स 12धावांनी विजयी;
सुपर लायन्स: 6षटकात 3बाद 61धावा(आशिष राठी नाबाद 25, रौनिक झवर 22, अंजनेया साठे 1-3, पिनाकिन मराठे 1-10, सौरभ चिंचनकर 1-10)पराभूत वि.अंजनेया ब्रेव बिअर्स: 5.3षटकात 2बाद 65धावा(गौरव सावगावकर 19, अंजनेया साठे 10, शिवकुमार जावडेकर नाबाद 10, गिरीश मजुमदार नाबाद 19, अभिजित राजवाडे 1-7);सामनावीर-अंजनेया साठे; अंजनेया ब्रेव बिअर्स 6गडी राखून विजयी;
ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 5बाद 50धावा(शिरीष आपटे 20, दर्शन कांकरिया नाबाद 11, अभय बागमार 1-2, आकाश जैन 1-3, प्रतीक वांगीकर 1-6)वि.वि.कासट ड्रॅगन्स: 6षटकात 3बाद 37धावा(गौरव कासट नाबाद 17, प्रतीक वांगीकर 11, करण बापट 1-4);सामनावीर-शिरीष आपटे; ओव्हन फ्रेश टस्कर्स 13धावांनी विजयी.