पुणे, 9 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतपंडित जावडेकर डॉल्फिन्स, लाइफसायल स्नो लेपर्ड्स, स्वोजस टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आनंद परचुरे(27 धावा व 1-6) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पंडित जावडेकर डॉल्फिन्स संघाने साठे-बोथरा जॅगवॉर्सचा 43 धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात ओंकार वैद्य नाबाद 37 धावांच्या जोरावर लाइफसायल स्नो लेपर्ड्स संघाने कोतवाल बदामीकर युनिकॉर्नस् संघाचा 8गडी राखुन पराभव करून विजयी सलामी दिली. देवेंद्र चितळेच्या 33धावांच्या खेळीच्या जोरावर स्वोजस टायगर्स संघाने ट्रुस्पेस नाइट्स संघाचा 1धावेने थरारक विजय मिळवला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष श्री कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव श्री सारंग लागू, पुसाळकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहन पुसाळकर, क्लबचे क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, होडेकचे अभिजीत खानविलकर व हर्निश राजा, बेलवलकर हाउसिंग लिमिटेडचे समीर बेलवलकर, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्सचे श्रीनिवास चाफळकर, सुजनीलचे आशिष देसाई, सुप्रीम इंफ्राचे आमीर आजगांवकर, नेव्हीटास जेनसेटचे वेंकटेश कशेळीकर, अभिषेक ताम्हाणे आणि मंदार देवगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानीवडेकर, तन्मय आगाशे, शिरीष साठे, सिद्धार्थ भावे, नंदन डोंगरे, शिरीष आपटे, विकास आचलकर, सिद्धार्थ दाते आदी मान्यवर उपस्थित होते. महेंद्र गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (PYC- Vijay Pusalkar Pandit Javadekar Dolphins, Lifecycle Snow Leopards, Svojas Tigers in PYC Premier League)
निकाल: साखळी फेरी:
पंडित जावडेकर डॉल्फिन्स : 6 षटकात 3 बाद 89धावा(समीर जोग नाबाद 22(6,3×6), अमित कुलकर्णी 25(14,3×6), आनंद परचुरे 27(11,2×4,2×6), हर्षल गंद्रे 1-5, निशाद चौघुले 1 -23) वि.वि.साठे-बोथरा जॅगवॉर्स: 6 षटकात 4बाद 46धावा(श्रवण सुरतवाला 15, हर्षल गंद्रे 13, आनंद परचुरे 1-6, सोहम परांजपे 1-6, राहुल चिंचोरे 1-4, राहुल पंडित 1-4); सामनावीर – आनंद परचुरे; पंडित जावडेकर डॉल्फिन्स 43 धावांनी विजयी;
कोतवाल बदामीकर युनिकॉर्नस्: 6 षटकात 6बाद 49धावा(परितोश शेट्टी 10, आशुतोष आगाशे 2-11, रोहन गाडगीळ 2-11) पराभुत वि.लाइफसायल स्नो लेपर्ड्स: 3.3 षटकात बिनबाद 54धावा(ओंकार वैद्य नाबाद 37(12,3×4, 3×6), अक्षय ओक नाबाद 16(10,1×6)); सामनावीर – ओंकार वैद्य; लाइफसायल स्नो लेपर्ड्स संघ 8 गडी राखून विजयी;
स्वोजस टायगर्स: 6 षटकात 2बाद 62धावा(देवेंद्र चितळे 33(22,4×4), मधुर इंगहळीकर 13, अभिषेक ताम्हाणे नाबाद 12, विश्वेश कटककर 1-14) वि.वि.ट्रुस्पेस नाइट्स: 6 षटकात 4 बाद 61धावा(शार्दुल वाळिंबे 33(13,2×4), रोहित अग्रवाल 17(9,1×4,1×6), प्रतीक शेट्टी 2-4); सामनावीर – देवेंद्र चितळे; स्वोजस टायगर्स संघ 1धावेने विजयी
महत्वाच्या बातम्या –
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत भारताच्या माया राजेश्वरन रेवती, फ्रांसच्या मोइस कौमे यांना विजेतेपद
सिकंदर रझावर ICCची मोठी ऍक्शन! आयरिश खेळाडूवर उगारली होती बॅट