पुणे, 10 डिसेंबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स यांनी सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इशांत रेगे(नाबाद 72धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर लायन्स संघाने रावेतकर बुल्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.अभिजीत गानू नाबाद 31 धावांच्या जोरावर बेलवलकर बॉबकॅट्स संघाने ए अँड ए शार्क्स संघावर 6 गडी राखून पराभव केला.
अन्य लढतीत क्रिश शहा(32धावा व 1-7) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीएम टायफुन्स संघाने ए अँड ए शार्क्सचा 16धावांनी पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली.कृष्णा मेहता(2-11 व नाबाद 30धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राहुल वेअर वुल्व्हस संघाने सैनुमेरो चिताज संघावर 7 गडी राखून विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
रावेतकर बुल्स: 6 षटकात 2बाद 88धावा(कर्णा मेहता नाबाद 36(15,4×4,2×6), रणजीत पांडे 25(13,1×4,2×6), यशोधन पानसे नाबाद 21(7,3) ×6), मोनीश गोखले 1-7, असीम देवगावकर 1-11) पराभुत वि.लायन्स: 5.5 षटकात 1बाद 90धावा(इशांत रेगे नाबाद 72(22,4×4,8×6), हर्षा जैन 13, प्रथमेश देशपांडे 1-19); सामनावीर – इशांत रेगे; लायन्स संघ 7 गडी राखून विजयी;
ए अँड ए शार्क्स: 6 षटकात 3बाद 57धावा(मन्नन नाबाद 26, रोहन पवार 14, नकुल बेलवलकर 1-3, नकुल पटेल 1-7) पराभुत वि.बेलवलकर बॉबकॅट्स: 4.4 षटकात 2बाद 58धावा(अभिजीत गानू नाबाद 31( 15,4×6), अनुज साबदे 18, यश चितळे 2-7); सामनावीर – अभिजीत गानू; बेलवलकर बॉबकॅट्स 6 गडी राखून विजयी;
जीएम टायफुन्स: 6 षटकात 2बाद 99धावा(क्रिश शहा 32(16,3×4,3×6), सुमेध गांगल नाबाद 31(12,3×4,2×6), निखिल कानिटकर नाबाद 18(4,2) ×6), द्रिश भुरट 1-24) वि.वि.ए अँड ए शार्क्स: 6 षटकात 2बाद 83धावा(मन्नन नाबाद 28(13,4×4,1×6), अंकुश जाधव 25(11,4×4,1× 6), प्रसाद जाधव 16, क्रिश शहा 1-7); सामनावीर – क्रिश शहा; जीएम टायफुन्स संघ 16 धावांनी विजयी;
बेलवलकर बॉबकॅट्स: 6 षटकात 3बाद 57धावा(अभिजीत गानू नाबाद 31(17,4×4,1×6), नील बेलवलकर 22(15,1×4,2×6), नंदन डोंगरे 1-5, तन्मय चोभे 1-8) पराभुत वि.रॉयल स्टॅलियन्स: 4.3 षटकात बिनबाद 61धावा(नील जैन नाबाद 34(15,2×4,3×6), ओजस साबडे नाबाद 26(12,3×4,1×6)); सामनावीर – नील जैन; रॉयल स्टॅलियन्स संघ 8 गडी राखून विजयी;
रावेतकर बुल्स: 6 षटकात 271/2 (कर्णा मेहता नाबाद 39 (17,3×4,3×6), पराग चोपडा 16, यशोधन पानसे 11, पिनाकिन मराठे 1-9) वि.वि.राहुल वेअर वुल्व्हस: 6 षटकात 5बाद 66धावा(मनीष साबडे 23(7,1×4,3×6), पार्थ सुर्डीकर 14, कृष्णा मेहता 12, नीलेश हार्डीकर 1-4, कर्णा मेहता 1-14, यशोधन पानसे 1-11); सामनावीर – कर्णा मेहता; रावेतकर बुल्स 5 धावांनी विजयी;
सैनुमेरो चिताज: 6 षटकात 4बाद 75धावा(गौतम मलकर्णेकर 22(9,3×4,1×6), सुधांशू मेडसीकर 21(12,2×4,1×6), विमल हंसराज 12, कृष्णा मेहता 2-11, पिनाकिन मराठे 1-9) पराभुत वि.राहुल वेअर वुल्व्हस: 5 षटकात 1बाद 76धावा(कृष्णा मेहता नाबाद 30(16,1×4,3×6), अनुज लोहाडे 28(10,4×6), पियुष शर्मा नाबाद 14, अनवीर नन्ना 1-5); सामनावीर – कृष्णा मेहता; राहुल वेअर वुल्व्हस 7 गडी राखून विजयी; (PYC- Vijay Pusalkar second win for GM Typhoons, Royal Stallions in PYC Premier League 2023)
महत्वाच्या बातम्या –
भारतासाठी प्रतिष्ठेची लढाई! शेवटच्या टी20त नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात, दोन्ही संघात महत्वाचे बदल
‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान