क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसचा दुसरा दिवस होता. क्वालीफायर 3 चा सामना प्रमोशन फेरीतील पहिल्या क्रमांकावर राहिलेला अहमदनगर पेरियार पँथर्स संघ विरुद्ध क्वालीफायर 1 चा विजयी नांदेड चांबल चॅलेंजर्स संघ यांच्यात झाला. यापूर्वी झालेल्या दोन्ही संघाच्या लढतीत अहमदनगर संघाने बाजी मारली होती. अहमदनगर संघाच्या पहिल्या चढाईत शिवम पटारे ची पकड नांदेड संघाने खात उघडला. त्यानंतर आदित्य शिंदे ने यशस्वी चढाई कर अहमदनगर संघाचा खात उघडलं.
अहमदनगर कडून आज शिवम पटारे व आदित्य शिंदे यांनी आक्रमक चढाया करत नांदेड संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नांदेडच्या बचावफळीने अफलातून कामगिरी केली. मध्यांतराला 16-15 अशी एक गुणांची आघाडी अहमदनगर संघाकडे होती. नांदेड संघाने 15 पैकी 9 गुण पकडीत मिळवले. त्यात सूरज पाटील ने 5 तर अभिषेक बोरुडे ने 4 पकडी केल्या होत्या. मध्यंतरा नंतर अहमदनगर संघाने नांदेड संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. 24-15 अश्या आघाडी नंतर अहमदनगर ने आपली आघाडी कायम ठेवली.
नांदेड कडून अजित चव्हाण ने सुपर रेड करत सामन्यात चुरस आणली होती. अजित चव्हाण या स्पर्धेत चढाईत 200 गुण मिळवणारा पहिला खेळाडू ठरला. उत्तरार्धात प्रफुल झवारे ने उत्कृष्ट खेळ करत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. अहमदनगर संघाने 40-27 असा विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. अहमदनगर संघाकडून आदित्य शिंदे ने चढाईत 10 गुण मिळवले तर प्रफुल झवारे ने अष्टपैलू खेळ करत 6 गुण मिळवले. कर्णधार अजित पवार ने 4 पकडी केल्या. नांदेड कडून अजित चव्हाण ने 8 गुण मिळवले तर अभिषेक बोरुडे व सूरज पाटील यांनी हाय फाय पूर्ण केला. (Qualifier 3 – Ahmednagar Periyar Panthers reach semi finals)
बेस्ट रेडर- आदित्य शिंदे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- प्रफुल झवारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! 21 वर्षीय जयसवालच्या खणखणीत षटकारामुळे CSKच्या चीअरलीडर्समध्ये खळबळ, पाहा व्हिडिओ
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’