मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकर व मुलींच्या गटात माही खोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकरने केरळच्या रायन कुथार्थ याचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकीत तामिळनाडूच्या प्रणव रेथीन याने हरियाणा दहाव्या मानांकीत व्हिक्टर मोहनरामचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तामिळनाडूच्या तिस-या मानांकीत महालिंगम कांढवळ याने दिल्लीच्या वंश कामरा याचा 6-4, 6-2 असा तर तेलंगणाच्या चौथ्या मानांकीत चैत्र रेड्डीने कर्नाटकच्या क्रिश त्यागीचा 6-2, 6-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या माही खोरेने ऐश्वर्या जाधवचा 6-2, 6-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अव्वल मानांकीत रिया सचदेवाने महाराष्ट्राच्या सातव्या मानांकीत आस्मि आडकरचा 6-4, 6-3 असा तर दिल्लीच्या दुस-या मानांकीत समिक्षा दबसने हरियाणाच्या नवव्या मानांकीत राजा किलारूचा 6-1, 6-1 असा पराभव केला. ओरिसाच्या तिस-या मानांकीत सोहिनी मोहंतीने दिल्लीच्या दहाव्या मानांकीत वामीका शर्माचा 6-1, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या प्रणव रेथीन व महालिंगम कांढवळ या जोडीने तेलंगणाच्या ऋषी बटलंकी व प्रणित भाटीया यांचा 6-1, 6-3 असा तर कर्नाटकच्या रूरीक रजनी व क्रिश त्यागी यांनी कर्नाटकच्या श्री तम्मा व महाराष्ट्राच्या निल जोगळेकर यांचा 6-2, 3-6, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत दिल्लीच्या रिया सचदेवा व समिक्षा दबस यांनी आपल्याच राज्यातील दिव्या अंगरीश व वामीका शर्मा यांचा 6-2, 6-2 असा तर महाराष्ट्राच्या नैनीका रेड्डीने तेलंगणाच्या साराथानीया गोगुलमंदाच्या साथीत तेलंगणाच्या लक्ष्मी दांडू व पश्चिम बंगालच्या साईजयानी बॉनर्जी यांचा 6-3, 4-6, 10-7 असा पराभव करत दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
उपांत्यपुर्व फेरी: 12 वर्षाखालील मुले:
प्रणव रेथीन(तामिळनाडू)(1)वि.वि. व्हिक्टर मोहनराम(10)(हरियाणा) 6-0, 6-1
अर्णव पापरकर(2)(महाराष्ट्र) वि.वि रायन कुथार्थ(केरळ) 6-3, 6-3
महालिंगम कांढवळ(3)(तामिळनाडू)वि.वि.वंश कामरा(दिल्ली) 6-4, 6-2
चैत्र रेड्डी(4)(तेलंगणा)वि.वि. क्रिश त्यागी(11)(कर्नाटक)6-2, 6-1
12वर्षाखालील मुली:
रिया सचदेवा(1)(दिल्ली)वि.वि. आस्मि आडकर(7)(महाराष्ट्र) 6-4, 6-3
समिक्षा दबस(2)(दिल्ली) वि.वि राजा किलारू(9)(हरियाणा) 6-1, 6-1
सोहिनी मोहंती(3)(ओरिसा)वि.वि. वामीका शर्मा(10)(दिल्ली) 6-1, 6-2
माही खोरे(महाराष्ट्र) वि.वि. ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र) 6-2, 6-0
दुहेरी गट: उपांत्य फेरी: 12 वर्षाखालील मुले:
प्रणव रेथीन(तामिळनाडू)/ महालिंगम कांढवळ(तामिळनाडू) वि.वि ऋषी बटलंकी(तेलंगणा)/प्रणित भाटीया(तेलंगणा) 6-1, 6-3
रूरीक रजनी(कर्नाटक)/क्रिश त्यागी(कर्नाटक) वि.वि श्री तम्मा(कर्नाटक)/निल जोगळेकर(महाराष्ट्र) 6-2, 3-6, 10-7
दुहेरी गट: उपांत्य फेरी: 12 वर्षाखालील मुली:
रिया सचदेवा(दिल्ली)/ समिक्षा दबस(दिल्ली) वि.वि दिव्या अंगरीश(दिल्ली)/वामीका शर्मा(दिल्ली) 6-2, 6-2
नैनीका रेड्डी(महाराष्ट्र)/साराथानीया गोगुलमंदा(तेलंगणा) वि.वि लक्ष्मी दांडू(तेलंगणा)/साईजयानी बॉनर्जी(पश्चिम बंगाल) 6-3, 4-6, 10-7