पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात चौथ्या मानांकीत जयेश पुंगलियाने अव्वल मानांकीत फैजल कुमारचा 6-4, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तिस-या मानांकीत इशाक इकबालने कुणाल वझिरानीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर महिला गटात नताशा पल्हाने नित्याराज बाबुराज तर हुमेरा शेखने अविष्का गुप्ता हीचा पराभव करत अंतिम फेरीत गाठली.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत महिला गटात अव्वल मानांकीत नताशा पल्हाने तिस-या मानांकीत नित्याराज बाबुराजचा 6-1, 6-3 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुस-या मानांकीत हुमेरा शेखने सहाव्या मानांकीत अविष्का गुप्ताचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला.
पुरुष गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित जयेश पुंगलियाने अव्वल मानांकीत फैजल कुमारचा 6-4, 5-7, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत सनसनाटी निकालाची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तिस-या मानांकीत इशाक इकबालने बिगर मानांकीत कुणाल वझिरानीचा 6-4, 6-4 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
दुहेरीत पुरुष गटात फैजल कुमार व फरदीन कुमार या जोडीने रोहन भाटिया व अरमान भाटिया यांचा संघर्षपुर्ण लढतीत 5-7, 7-5,10-5 असा तिन सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली तर निकित रेड्डी व ऋषी रेड्डी यांनी जयेश पुंगलिया व कुणाल वझिरानी यांचा 7-5, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या दुहेरी गटात हुमेरा शेख व सालसा आहेर या जोडीने अपूर्वा एसबी व अविष्का गुप्ता यांचा 6-3, 6-1 असा तर नित्याराज बाबुराज व सौम्या विज यांनी आकांक्षा नित्तूरे व कोसामी सिन्हा यांचा 6-1, 6-3 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: पुरुष गट: उपांत्य फेरी:
जयेश पुंगलिया(4)वि.वि. फैजल कुमार(1) 6-4, 5-7, 6-4
इशाक इकबाल(3)वि.वि. कुणाल वझिरानी 6-4, 6-4
महिला गट:
नताशा पल्हा(1वि.वि. नित्याराज बाबुराज(3) 6-1, 6-3
हुमेरा शेख(2)वि.वि. अविष्का गुप्ता(6) 6-0, 6-2
दुहेरी: पुरुष गट:
फैजल कुमार/फरदीन कुमार वि.वि. रोहन भाटिया/अरमान भाटिया 5-7, 7-5,10-5
निकित रेड्डी/ऋषी रेड्डी वि.वि. जयेश पुंगलिया/कुणाल वझिरानी 7-5, 6-4
महिला गट:
हुमेरा शेख/सालसा आहेर वि.वि. अपूर्वा एसबी/ अविष्का गुप्ता 6-3, 6-1
नित्याराज बाबुराज/सौम्या विज वि.वि. आकांक्षा नित्तूरे/कोसामी सिन्हा 6-1, 6-3