भारत पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव खूप वाढताना दिसत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान खूप गडबडून गेला आहे. ते एका पाठोपाठ एक कारस्थान करत आहे. ज्याच त्यांना उत्तर देण्यात आलं आहे. बुधवारी पाकिस्तानने भारताच्या काही शहरांमध्ये हल्ले केले. भारताने पाकिस्तान का सडेतोड उत्तर देत त्यांचे मिसाइल आणि ड्रोन खाली पाडले. पण या हल्ल्याचा परिणाम आयपीएल स्पर्धेवर होताना दिसत आहे . धर्मशाळा स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला, यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, ही स्पर्धा पुढे खेळली जाईल की या स्पर्धेला स्थगित केले जाईल. याशिवाय बीसीसीआयकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
जम्मू आणि पठाणकोट मध्ये हवाई हल्ल्यांची माहिती समोर आल्यानंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स चालू सामनामध्ये रद्द करण्यात आला. 11 मे रोजी जो सामना धर्मशाळांमध्ये खेळला जाणार आहे, तो आधीच दुसऱ्या ठिकाणावर हलवण्यात आला आहे. पण दोन्ही देशांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. अशामध्ये शुक्रवार 9 मे रोजी बीसीसीआयची तात्काळ मीटिंग होणार आहे. 8 मे रोजी आयपीएल सामना रद्द झाल्यानंतर आयपीएल कौन्सिल यांच्यामध्ये मीटिंग झाली होती यावर अंतिम निर्णय आज करण्यात येऊ शकतो.
आयपीएल चेअरमन अरुण धुमळ यांनी गुरुवार रोजी म्हटले होते की, पाकिस्तान सोबत सैन्याशी युद्धाची परिस्थिती बघून आयपीएल चालू राहील की नाही यावर अंतिम निर्णय घेण्याआधी सरकारच्या निर्णयाची वाट बघितली जाईल. अशा परिस्थितीत आयपीएल स्पर्धा पुढे खेळली जाईल किंवा रद्द केली जाईल याचा निर्णय सरकारच्या हातात आहे. सध्या बीसीसीआय त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे की, हंगाम कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. मार्च ते मे पर्यंत असा एक टाईम असतो, जेव्हा मोठे मोठे देश इंटरनॅशनल क्रिकेट खेळत नाहीत.
बीसीसीआय सामन्यांचे ठिकाणे बदलण्याचा विचार करू शकते. ज्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान संघर्षाचा तणाव कमी आहे आणि जे ठिकाण सुरक्षित आहे, तेथे उरलेले सामने आयोजित केले जाऊ शकतात. याआधी कोरोना नंतर जेव्हा भारतात आयपीएलचे पुनरागमन झाले होते, तेव्हा काहीच ठिकाणांवर सामने खेळले गेले होते. त्यामुळे घरेलू आणि अवे फॉरमॅट रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना कमी प्रवास करावा लागेल.
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यांची मीटिंग या विषयावर असणार आहे की, आयपीएल उरलेली स्पर्धा दुसऱ्या देशात शिफ्ट केली जाऊ शकते. याआधी सुद्धा भारताच्या बाहेर आयपीएल स्पर्धा खेळली गेली आहे. यामुळे बीसीसीआयकडे हा एक पर्याय असू शकतो. मागेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुद्धा मोठा निर्णय घेत, पाकिस्तान क्रिकेटचे उरलेले सामने दुबईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलचा हा हंगाम रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. आयपीएल 2021 सुद्धा दोन चरणांमध्ये खेळाला गेला होता. कोरोनाच्या कारणाने आयपीएल 2021 4 मे रोजी स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसऱ्या चरणाचे आयोजन युएईमध्ये झालं होतं. पहिल्या चरणात 29 सामने खेळले गेले होते, बाकीचे 31 सामने दुसऱ्या चरणात घेण्यात आले होते.