रविवारी (26 मार्च) वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धमाकेदार खेळी केली. दक्षिण आफ्रिका संघासाठी क्विंटन डी कॉक, तर वेस्ट इंडीजसाठी जोनासन जार्ल्स यांनी वैयक्तिक शतके ठोकली. दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला, ज्यामध्ये डी कॉकच्या शतकाचे योगदान महत्वाचे राहिले. याचसोबत डी कॉक एका खास यादीत सामील झाला आहे.
क्विंड डी कॉक (Quinton De Kock) दक्षिण आफ्रिका संघाच्या काही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक राहिला आहे. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने यापूर्वी 23 शतके ठोकली आहेत. पण रविवारी पहिल्यांदाच तो टी-20 फॉरमॅटमध्ये शतक ठोकू शकला. याचसोबत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा डी कॉक दक्षिण आफ्रिका संघाचा दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघासाठी अशी कामगिरी करणारा फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) एकमेव खेळाडू होता. डू प्लेसीसने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1, वनडे क्रिकेटमध्ये 12, तर कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके केली आहेत. डी कॉकचा विचार केला, तर त्याने यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये 17, तर कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके केली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शतक ठोकल्यानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकी खेळाडू ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये शतके करण्याच्या बाबतीत भारतीय खेळाडू सर्वात पुढे आहेत. भारताचा एकूण पाच खेळाडूंनी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे, ज्यांच्या तीन खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानच्याही तीन खेळाडूंनी कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके केली आहेत. क्विंटन डी कॉकने रविवारी केलेल्या शतकीय खेळीनंतर दक्षिण आफ्रिका संघ यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारे खेळाडू
भारत – 5
ऑस्ट्रेलिया – 3
पाकिस्तान – 3
दक्षिण आफ्रिका – 2*
इंग्लंड – 2
न्यूझीलंड – 2
श्रीलंका – 2
वेस्ट इंडीज – 1
बांगलादेश – 1
आयर्लंड – 1
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 5 बाद 258 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने 18.5 षटकात 4 बाद 259 धावा केल्या आणि विजय मिळवला. डी कॉकने अवघ्या 44 चेंडूत 100 धावा केल्या आणि विकेट गमावली. तसेच वेस्ट इंडीजसाठी जोनासन चार्ल्स याने अवघ्या 39 चेंडूत 100 धावा केल्या. जोनासनने या सामन्यात एकूण 46 चेंडू खेळून 118 धावा केल्या.
(Quinton de Kock has become the second South African batsman to score centuries in all three forms of international cricket.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेने घडवला इतिहास! टी20 मध्ये पार केले 259 धावांचे आव्हान, डी कॉकचे वादळी शतक
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी