बुधवारी (१८ मे) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा सामना खेळला गेला. प्लेऑफच्या दृष्टीने उभय संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या सलामीवीरांनी जबरदस्त प्रदर्शन केले. दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक याने शतकी खेळी केली.
कर्णधार केएल राहुलला साथीला घेत डी कॉकने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अवघे ३६ चेंडू खेळताना त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढेही आपली फटकेबाजी सुरू ठेवत त्याने केवळ ५९ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील केवळ दुसरे शतक आहे. तसेच तो चालू हंगामात शतक करणारा तिसराच फलंदाज ठरला आहे.
CENTURY for Quinton de Kock off just 59 deliveries.
His second in #TATAIPL 👏👏 #KKRvLSG pic.twitter.com/Migx1iDVmu
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
यापूर्वी डी कॉकने २०१६ साली दिल्ली डेअरडेविल्सने प्रतिनिधित्त्व करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठोकले होते. या सामन्यात त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल ६ वर्षांनी त्याच्या बॅटमधून शतक निघाले आहे.
डी कॉकने शतक झळकावल्यानंतरही आपल्या फलंदाजीचा वेग कमी केला नाही. त्याने पुढेही आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत डावाखेर नाबाद १४० धावा फटकावल्या. ७० चेंडू खेळताना १० षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच आयपीएल इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा तो ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्यूलमनंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.
तसेच त्याने राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी अभेद्य २१० धावांची भागीदारीही रचली आहे. ही आयपीएलमधील पहिल्या विकेटसाठी झालेली सर्वोच्च भागीदारी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय केएल राहुल, सलग पाचव्या आयपीएल हंगामात ५०० धावा चोपत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
क्लास क्लास क्लास…! क्विंटन डी कॉकचे केकेआरविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक
रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक