इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. लीगच्या ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला लखनऊ सुपरजायंट्स संघाने ६ विकेटने पराभूत केले. बेब्राॅर्न स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २१० धावा केल्या. २११ धावांचे लक्ष्य लखनऊने ४ गडी गमावत १९.३ षटकांत पूर्ण केले. सीएसकेला केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील अपयश आले होते.
लखनऊ संघाचा चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय हा हंगामातील पहिला विजय आहे. लखनऊ संघातील फलंदाजांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. क्विंटन डी काॅक आणि केएल राहुल यांनी या सामन्यात ९९ धावांची भागिदारी केली. डिकाॅकची खेळी प्रभाव टाकणारी होती. त्याने या सामन्यात ४५ चेंडूत ६१ धावा केल्या. या यशाबद्दल आता डिकाॅकने मोठे व्यक्तव्य केले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डिकाॅक सामन्यानंतर म्हणाला की, “अविश्वासनीय, संघाचा आत्मविश्वास उंचवण्यासाठी हा विजय शानदार आणि चांगला होता. सामन्यात लढताना जिंकणे आणि शिर्ष स्थानी येणे खूप खास असते. आम्ही विचार केला होता की आम्ही २१० धावांचा पाठलाग करु शकतो, पहिल्या दोन-तीन षटकांनंतर पाहिले की खेळपट्टी कशी आहे.”
तो पुढे म्हणाला की, “हे पूर्ण करणे आमच्यासाठी चांगले होते. फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा एविन लुईस खुप घाईत खेळला नाही, त्याला माहीत होते की ही एक चांगली खेळपट्टी आहे आणि दुसऱ्या खेळाडूंसाठी चांगले आहे. एविनने शानदार खेळी खेळली. २१० धावांचे आव्हान पूर्ण करणे म्हणजे हा सामना अतीतटीचा होणार होता. परंतु, सहकारी खेळाडू खूप शांत राहून खेळले. हे लक्ष्य गाठणे हे एक शानदार काम होते.”
सीएसके आपला तिसरा सामना ३ एप्रिलला पंजाब किंग्स संघाविरुद्ध खेळणार आहे. तर लखनऊ ४ एप्रिलला हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo
IPL2022| कोलकाता वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!