---Advertisement---

का झाली आर अश्विन आणि हर्षल गिब्समध्ये शाब्दिक चकमक?

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2018 6:00 PM
---Advertisement---

आज ट्विटरवर भारताचा फिरकीपटू आर अश्विन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्स यांच्यामध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. अश्विनच्या ट्विटवर गिब्सने मजेशीर अर्थाने रिप्लाय दिला होता. या रिप्लायचे उपहासात्मक उत्तर देताना अश्विनने मात्र त्याला मॅच फिक्सिंगची आठवण करून दिली.

अश्विनने नायकेच्या बुटांच्या प्रमोशनचा व्हिडीओ ट्विट केला होता. यावर गिब्सने अश्विनला रिप्लाय दिला होता की, “आशा आहे की तू आता वेगाने धावू शकतो.”

https://twitter.com/ashwinravi99/status/965497281398030336

https://twitter.com/hershybru/status/965515311834390528

यावर अश्विनने २००० साली झालेल्या मॅच फिक्सिंगची आठवण करून देताना गिब्सला उत्तर दिले की, “नक्कीच तुझ्या इतका मी वेगवान नाही मित्रा. तुझ्याइतका मला वेग मिळालेला नाही. पण मला चांगले नैतिक विचार दिले आहेत की सामना फिक्स करून माझ्या ताटात अन्न येत नाही.”

२००० साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील काही सामने फिक्स झाले होते. या फिक्सिंग प्रकरणात दोन्ही संघाचे कर्णधार हँसी क्रोनिए आणि मोहम्मद अझरूद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात अली होती. या प्रकरणात गिब्सचाही समावेश होता, त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्याची बंदी आणि दंड करण्यात आला होता.

गिब्सने पुढे अश्विनला त्याने चुकीचा अर्थ घेतला असल्याचे सांगताना म्हणाला की “तू मस्करी म्हणून या गोष्टीला घेतले नाहीस. पण ठीक आहे आपण पुढे जाऊया.”

https://twitter.com/hershybru/status/965523683312795649

यावर अश्विन म्हणाला, ” मी दिलेले उत्तरही मस्करीचं होती. पण तू आणि बाकी लोकांनी त्याचा वेगळा विचार केला. मी सुद्धा मस्करीचं करत होतो. आपण कधीतरी या विषयावर चर्चा करताना जेवण करू.”

काही वेळानंतर अश्विनने तो उपहासात्मक ट्विट डिलिट केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment