मोहाली| आज आयपीएलचा 16 वा सामना किंग्ज एलेवन पंजाब विरूध्द सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर अश्विन आयपीएल २०१८मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
हा सामना आय एस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे होत आहे. यामध्ये दोन्ही संघानी आत्तापर्यंत प्रत्येकी 3 सामने खेळले आहे. यातील हैद्राबादने तीन तर पंजाबने दोन सामने जिंकले आहेत.
पंजाबने याआधीच्या सामन्यात चेन्नईला पराभूत केले होते. पहिली फलंदाजी करताना पंजाबने चेन्नईला 198 धांवाचे लक्ष्य दिले होते. हा सामना पंजाबने 4 धावांनी जिंकला होता. पंजाबकडे ख्रिस गेल आणि केएल राहूल यांसारखे तडाखेबाज फलंदाज आहेत. गोलंदाजानीत मोहित शर्मा, कर्णधार आर अश्विन आहेत.
हैद्राबादने या आधीच्या सामन्यांमध्ये राजस्थान, मुबंई आणि कोलकातावर विजय मिळवला आहे. या तीनही सामन्यात त्यांनी पहिले क्षेत्ररक्षणच केले आहे.
त्यांच्या गोलंदाजानीसुध्दा विरूध्द संघातील सलामीच्या फलंदाजांना लवकर बाद केले तसेच मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. क्षेत्ररक्षणामध्ये संघातील मनिष पांडे, शाकिब अल हसन आणि राशिद खान या खेळाडूंनी खुप योगदान दिले आहे.
तीन विजयासह हैद्राबाद गुणतालिकेत दुसऱ्या तर पंजाब दोन विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.
किंग्ज एलेवन पंजाब: आर अश्विन ( कर्णधार ), ख्रिस गेल , के एल राहूल ,अॅरोन फिंच,मंयक अग्रवाल,युवराज सिंग, करूण नायर, मोहित शर्मा, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान,अॅड्रे टाय
सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, दिपक हुडा,भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण,राशिद खान, सिध्दार्थ कौल, ख्रिस जॉर्डन