---Advertisement---

टी20 सामना अश्विनने बनविला कसोटी! केली अशी झकास गोलंदाजी

On: बुधवार, सप्टेंबर 28, 2022 9:40 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बऱ्याच काळानंतर पुनरागमन करत असलेल्या अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अत्यंत कंजूस गोलंदाजी सादर केली. 

वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर अश्विन फारसे स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नव्हता. या सामन्यात युजवेंद्र चहल याच्या जागी त्याला संधी देण्यात आली. दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय संघाला सामन्यात पुढे केले. मात्र, त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या रविचंद्र अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगले जखडून ठेवले‌. ‌‌ त्याने आपल्या चार षटकात केवळ 8 धावा दिल्या. यात एक षटक निर्धाव होते. त्याला बळी मिळवण्यात अपयश आले.

अश्विनला बळी मिळाला नसला तरी हा त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम स्पेल ठरला. यापूर्वी त्याने 2016 मधवय श्रीलंकेविरुद्ध 4 षटकात 8 धावा देत 4 बळी मिळवले होते. तर तत्पूर्वी त्याने सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली. तेव्हा त्याने 11 धावा देत चार गाड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला.

रविचंद्र अश्विन हा भारताचा सर्वात अनुभवी फिरकीपटू आहे. मागील वर्षी तब्बल तीन वर्षानंतर त्याने टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी20 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –
चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर
विराट-रोहितमध्ये लागलीये महानतेची रेस! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोघांतच रंगणार ‘रनसंग्राम’ 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---