---Advertisement---

दस का दम! कसोटी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा अश्विनने दाखवला स्टोक्सला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडीओ

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान गेल्या ३ दिवसांपासून दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या चौथ्या दिवशीही (१६ फेब्रुवारी) यजमान भारताने पाहुण्या इंग्लंड संघावरील दबाव कायम राखला आहे. त्यातही भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने दिवसाच्या सुरुवातीलाच संघाला २ महत्त्वपुर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्यातील इंग्लंडचा डावखुरा फलंदाज बेन स्टोक्सची विकेट त्याच्यासाठी अतिशय खास ठरली आहे.

सलामीवीर डॅनियल लॉरेन्सला यष्टीचीत केल्यानंतर स्टोक्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संघापुढे ४२९ धावांचे भलेमोठे आव्हान आहे, वरुन आपण आघाडीचे ४ फलंदाज गमावले आहेत, अशास्थितीत स्टोक्सने सावध खेळी करणे योग्य समजले. त्यानुसार तब्बल ५१ चेंडूंचा सामना करताना स्टोक्सने ८ धावा काढल्या. मात्र डावातील ३८ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनच्या फिरकीपासून तो स्वतला वाचवू शकला नाही.

अश्विनने ३८ व्या षटकातील शेवटचा चेंडू स्टोक्सच्या अगदी जवळ टाकला. तो चेंडू टप्पा घेऊन स्टोक्सच्या पायाला लागला आणि त्याच्या हातामधील अंतरातून सरळ यष्टीच्या दिशेने गेला. यावेळी रिषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यष्टीमागे सावध उभे होते. परंतु पंतने पकडेपर्यंत चेंडू मागे गेला. तेवढ्यात विराटने डाइव्ह मारत दोन्ही हातांनी चेंडू पकडला आणि स्टोक्स झेलबाद झाला.

https://twitter.com/SChidamalwad/status/1361556181026623493?s=20

महत्त्वाचे म्हणजे, अश्विनने स्टोक्सला बाद करण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापुर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही त्याने स्टोकला बाद केले होते. तर पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने स्टोक्सला आपले शिकार बनवले होते. अशाप्रकारे अश्विनने आजवर स्टोक्सला कसोटीत सर्वाधिकवेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. त्याने सर्वाधिक १० वेळा स्टोक्सला बाद केले आहे.

अश्विननंतर स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम नॅथन लायनने केला आहे. त्याने ६ वेळा स्टोक्सला आपले गिऱ्हाईक बनवले आहे. तर केमार रोच आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी ५ वेळा स्टोक्सची काढली आहे.

बेन स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज-
१० वेळा- आर अश्विन
६ वेळा- नॅथन लायन
५ वेळा- केमार रोच आणि दिलरुवान परेरा

महत्त्वाच्या बातम्या-

असा रचला होता पंत-अश्विनने लॉरेन्सच्या विकेटचा सापळा, चाहत्याने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

गुलीगत धोका! अश्विनचा चेंडू लॉरेन्सच्या पायातून पंतकडे, क्षणाचाही विलंब न करता पाठवला तंबूत

‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे,’ अश्विनच्या लक्षणीय खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---