बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND)यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवार (15 डिसेंबर) या सामन्याचा दुसरा दिवस असून भारताला सुरूवातीलाच श्रेयस अय्यर याच्या स्वरूपात झटका बसला. तो 86 धावा करत तंबूत परतला. यामुळे भारताचा संघ काहीसा अडचणीत आला होता. त्यानंतर आर अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने बांगलादेशी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याबरोबर त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 13वे अर्धशतक पूर्ण केले.
आर अश्विन (R Ashwin) याने हे अर्धशतक 91 चेंडूत पूर्ण केले. तो 58 धावा करत बाद झाला. या खेळीमध्ये त्याने दोन चौकार आणि तेवढेच षटकार मारले आहेत. दुसरीकडून त्याला कुलदीप यादव याचीही चांगली साथ मिळाली. या दोघांनी संघ अडचणीत असताना महत्वाची अशी 87 धावांची भागीदारी केली आहे. यादव 40 धावा करत बाद झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनची कामगिरी पाहिली तर यावर्षी त्याने आतापर्यंत चार सामने खेळले असून पाचवा सध्या खेळत आहे. यामध्ये त्याने 2 अर्धशतके केली आहेत. यावर्षीचे पहिले अर्धशतक त्याने श्रीलंकेविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजी करतानाच केले होते. मोहालीत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात त्याने 82 चेंडूत 61 धावा केल्या होत्या.
अश्विनने कसोटीमध्ये आठव्या क्रमांकावरच फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतके (6) केली आहेत. तसेच त्याने कसोटीमध्ये 5 शतके केली असून त्यातील तीन शतके ही याच क्रमांकावर फलंदाजी करताना केली आहेत.
FIFTY!
A well made half-century off 91 deliveries for @ashwinravi99 👏💪
This is his 13th in Test cricket.
Live – https://t.co/CVZ44NpS5m #BANvIND pic.twitter.com/n2lE5armDV
— BCCI (@BCCI) December 15, 2022
या सामन्यात भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राहुल, शुबमन गिल आणि विराट कोहली हे झटपट बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी सांभाळून खेळ केला. दोघांंनी 64 धावांची भागीदारी केली. पंत 46 धावा करत बाद झाला. त्याचबरोबर पुजारा-अय्यर जोडीने पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. पुजारा 90 आणि अय्यर 86 धावा करत विकेट गमावून बसले. R Ashwin Half Century against Bangladesh in First Test Match
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्पिनर्सविरोधात विराट गरजेपेक्षा जास्त सावध भूमिका घेतो? वसीम जाफरने दिले उत्तर
FIFA World Cup 2022: मोरोक्कोचा स्वप्नभंग, फ्रांस सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये; अर्जेंटिनाशी भिडणार