टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) मध्ये भारत आणि झिम्बाब्वे या संघांमध्ये रविवारी (दि. 6 नोव्हेंबर) सामना खेळला गेला. या सामन्याच्या नाणेफेकीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नाणेफेकीच्यावेळी रोहित शर्मा इयान बिशप यांच्याशी चर्चा करत असताना आणि त्याच्या पाठीमागे आर. अश्विन संघाच्या जर्सीचा वास घेताना दिसला. ही गोष्ट एका चाहत्याने आपल्या फोनच्या कॅमरामध्ये कैद केली. यावर आता आर अश्विन याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ही गोष्ट भारत विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यादरम्यानची आहे. जेव्हा रोहित शर्मा नाणेफेकीसाठी मैदानात आलेला. नाणेेफेक झाल्यानंतर तो इयान बिशप यांच्याशी संवाद साधत होता. त्यावेळी कॅमऱ्याच्या फ्रेममध्ये मागील बाजूला आर अश्विन देखील दिसला.मैदानातील सराव संपवून तो ड्रेसिंग रूममध्ये जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या संघाच्या दोन जर्सीपैकी त्याची नेमकी कोणती यात फरक ओळखण्याचा तो प्रयत्न करु लागला. अश्विनचे हेच प्रयत्न कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत याची त्याला कल्पनाही नव्हती.
https://twitter.com/HateDetectors/status/1589918841370710016?s=20&t=wfRORDnCbdnbeIYMb_GhFg
अश्विनने त्याची जर्सी ओळखण्यासाठी बऱ्याच गोष्टीं करुन पाहिल्या. जर्सी ओळखण्यासाठी त्याने आधी त्या मापांची पाहणी केली.पण दोन्ही जर्सी एकाच मापाच्या निघाल्या. त्यानंतर त्याने परफ्युमच्या वासावरुन जर्सी ओळखली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला. या व्हिडिओला सोशल मीडियावर उधाण आल्यानंतर अश्विनने यावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
Checked for the sizes to differentiate!❌
Checked if it was initialed❌
Finally 😂😂 checked for the perfume i use✅
😂😂
Adei cameraman 😝😝😝😝 https://t.co/KlysMsbBgy— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) November 8, 2022
अश्विनने या ट्वीटमध्ये म्हटले की,”मी जर्सी ओळखण्यासाठी साईझ चेक केली,पण दोन्ही एकाच साईझच्या होत्या. त्यानंतर मी पाहिले की त्या दोन्हीपैकी एखाद्या जर्सीवर कुणाचे ओळखचिन्ह आहे का, ही पद्धतही कामाला आली नाही. शेवटी मी वापरत असलेल्या परफ्यूमच्या वासावरुन जर्सी ओळखण्याचा प्रयत्न केला आणि ही पद्धत कामालाही आली. हे सगळ कॅमेऱ्यात टिपणारा कॅमेरामनही कमालाच आहे.”
अश्विनने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 22 धावा देत 3 गडी बाद केलेले. भारताने हा सामना 71 धावांनी जिंकला होता. या विजयानंतर भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवारी (दि. 10 नोव्हेंबर) खेळवण्यात येईल. (R. Ashwin has revealed the reason behind smelling the jersey)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार
रोहितच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट, सेमीफायनल खेळणार की नाही कर्णधाराने स्वतःच सांगितले