भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आली नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला. तर न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत पोहचणे कठीण झाले आहे. परंतु अफगानिस्तान संघाविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.
मात्र भारतीय संघाला उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच न्यूझीलंड विरुद्ध अफगानिस्तान या सामन्याचा निकाल देखील भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यापूर्वी आर अश्विनने अफगानिस्तान संघाला मदत करण्याची घोषणा केली आहे.
भारतीय संघाला अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात आर अश्विनने मोलाची भूमिका बजावली होती. तसेच स्कॉटलॅंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात देखील आर अश्विनला मोलाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आर अश्विनने मजेशीर वक्तव्य करत मदत करण्याची घोषणा केली आहे. यासह एक खास सल्ला देखील दिला आहे.
स्कॉटलॅंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी आर अश्विनने म्हटले की, “अफगानिस्तानला शुभेच्छा. आमच्या आशा आता त्यांच्यावर टिकून आहेत. जर आम्ही त्यांना काही प्रकारचे फिजिओ सपोर्ट देऊ शकलो तर मुजीब (मुजीब उर रहमान) मैदानात उतरू शकेल.”
अश्विनचे हे मजेशीर वक्तव्य अफगानिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब उर रहमानसाठी होते. ज्याने स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ५ गडी बाद केले होते. तर पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात महत्वाचा एक गडी बाद केला होता.
भारतीय संघाचे लक्ष अफगानिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर असणार आहे. कारण न्यूझीलंड संघाने देखील आपला पहिला सामना गमावला होता. न्यूझीलंड संघ ३ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांचा रनरेट भारतीय संघापेक्षा चांगला आहे. परंतु अफगानिस्तानपेक्षा खराब आहे. त्यामुळे जर अफगानिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले तर न्यूझीलंड संघाचा रनरेट आणखी खराब होऊ शकतो. ज्यामुळे भारत आणि अफगानिस्तान संघ ६-६ गुण घेऊन बरोबरीत येऊ शकतात. त्यानंतर ज्यांचा रनरेट चांगला असेल तो संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ
नामिबियाला धूळ चारत सेमीफायनलचा मार्ग सोपा करण्यावर न्यूझीलंडची नजर, पराभूत झाल्यास भारताचा फायदा
भारत विरुद्ध स्कॉटलँड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!