भारतीय संघाला जुलै महिन्याअंती वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. यातील टी२० मालिकेसाठी गुरुवारी (१४ जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा आणि अनुभवींचा मिळून भक्कम फिरकी विभाग निवडला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs IND) १८ सदस्यीय टी२० संघात ५ वेगवान गोलंदाज आणि ५ फिरकी गोलंदाजांची निवड केली गेली आहे. यातील फिरकी विभागावर नजर टाकायची झाल्यास, रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या २१ वर्षीय युवा फिरकीपटूवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे. तो सातत्याने त्याला मिळालेल्या संधीचे सोने करत दमदार प्रदर्शन करत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने आतापर्यंत ६ सामन्यात ७.४६ च्या इकोनॉमीने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
बिश्नोईबरोबर अनुभवी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) यांनाही संधी दिली गेली आहे. तसेच कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि आर अश्विन (R Ashwin) या वरिष्ठ फिरकीपटूंचेही संघात पुनरागमन झाले आहे. कुलदीपची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. त्याला मागील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेवेळी नेट्समध्ये सराव करताना हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. तर अश्विन जवळपास ८ महिन्यांनंतर टी२० संघात पुनरागमन करेल.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvsIND: लॉर्ड्सवर होणाऱ्या महत्वाच्या वनडे सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि हवामान, वाचा सविस्तर
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टिम इंडियाची घोषणा, विराटसह ‘हा’ वेगवान गोलंदाज बाहेर
Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य