इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात भारताच्या अनेक स्टार खेळाडूंची निराशाजनक कामगिरी झाली आहे. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे. तर काहींनी चांगला खेळ करत क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच विजेतेपद जिंकण्याचा विक्रम केला ही बाब कायमच लक्षात राहिल.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रविचंद्रन अश्विन हा त्याच्या खराब कामगिरीचा विचार देखील करत नाही असे धक्कादायक विधान खुद्द अश्विननेच केले आहे. त्याने संघाकडून पहिला हंगाम खेळताना १७ सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईच्या एका कार्यक्रमात अश्विन उपस्थित होता. “मी सामना झाल्यावर माझ्या गोलंदाजीचा विचार करत नाही. गोलंदाजी करताना काय चुका झाल्या त्याचा विचार करणे, अशा काळातून मी पुढे गेलो आहे. सध्या मी आधीच सगळे ठरवलेले असते आणि तसेच मी पुढे करतो. सध्या मी चांगल्या मनस्थितीत आहे,” असे अश्विन म्हणाला.
“अश्विन हा एक महान गोलंदाज आहे. पण त्याला त्याच्या गोलंदाजीवर आणि चेंडू ऑफ स्पिन करण्यावर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असे राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी म्हणत अश्विनच्या गोलंदाजीवर नाराजी व्यक्त केली होती.
भारताचा महान फिरकीपटू अश्विनची गोलंदाजी गुजरात विरुद्धच्या अंतिम सामन्यात खूपच अयशस्वी ठरली होती. त्याने ३ षटकात ३२ धावा दिल्या होत्या, तर एकही विकेट घेतली नव्हती. त्याआधी त्याने काही सामन्यांत उत्तम फलंदाजी केली आहे. आयपीएल २००९ पासून खेळणाऱ्या अश्विनने चेन्नई सुपर किंग्जसोबत २०१० आणि २०१२ च्या विजयी प्रवासात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. आयपीएलचे १३ हंगाम खेळताना त्याने १८४ सामन्यांत १५७ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ २ भारतीय खेळाडूंनी यूएसएला मिळवून दिला विजय, वनडेतील दमदार संघाला चारली धूळ
पहिले पाढे पंचावन्न..! लाख प्रयत्न करूनही आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच
दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराला दहा वर्षांपूर्वी समजलेलं कसा होणार आपला मृत्यू!