---Advertisement---

मॉर्गन सोबत झालेल्या वादावर अश्विनने केले वक्तव्य; म्हणाला, ‘या सर्व गोष्टींनी मला…’

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 12:22 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आपीएल सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती रविचंद्रन अश्विन आणि ओएन मॉर्गन यांची. रिषभ पंतला चेंडू लागून दूर गेला आणि त्यावर अश्विनने एक अतिरिक्त धाव घेतली. टीम साऊदीने रविचंद्रन अश्विनला बाद केले, तेव्हा ओएन मॉर्गनने त्याच्याशी वाद घातला होता.

रविचंद्रन अश्विनने अलीकडेच कबूल केले की, त्या सामन्यातील ओएन मॉर्गनच्या वक्तव्यामुळे तो निराश झाला होता. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अनुभवी फिरकीपटूने मैदानावर काय घडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

अश्विन म्हणाला की, तो गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या खेळाच्या शीर्षस्थानी आहे. त्याने असेही सांगितले की तो अशा घटनांकडे जास्त लक्ष देत नाही आणि सामन्यानंतर त्याने आपल्या रागावरही नियंत्रण ठेवले होते.

अनुभवी फिरकीपटू म्हणाला, ‘बघा, माझ्याबद्दल बरेच काही सांगितले जात आहे, तेव्हा मला वाटते की मी अशा प्रकारची व्यक्ती आहे, जो त्याच्या परिघातुन बाहेर पडणे आवश्यक समजतो. माझा विश्वास आहे की, हे खूप महत्वाचे आहे, हा विषय मी माझ्या डोक्यातून बाजूला केला आहे. मी याआधीही म्हटल्याप्रमाणे, मला वाटते की मी माझ्या खेळाचा आनंद घेत आहे आणि मी माझ्या खेळाच्या शीर्षस्थानी आहे. या सर्व गोष्टींनी मला काही फरक पडत नाही.’

रविचंद्रन अश्विनने मुंबई इंडियन्सविरुद्ध एका रोमहर्षक सामन्यात नाबाद २० धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. ३५ वर्षीय क्रिकेटपटूने सांगितले की, इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला त्याच्या फलंदाजीबद्दल चांगले वाटत आहे, त्यात सुधारणा झाल्या आहेत.

यावर्षी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात, सराव सामन्यांमध्ये तो चेंडू कसा मारायचा याचा त्याने चांगला सराव केला होता. अश्विन म्हणाला की, त्याने आक्रमक फटके खेळण्याआधी खेळपट्टीवर थोडा वेळ घालवणे आवश्यक होते. अश्विनला मुंबईविरुद्ध सामना जिंकवून दिल्याबद्दल सर्व बाजूंनी प्रशंसा मिळत आहे. अश्विनने कृणाल पांड्याच्या चेंडूवर षटकार खेचून दिल्लीला विजय मिळवून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

किती क्यूट!! ऋतुराज गायकवाड करतोय रैनाच्या दीडवर्षीय मुलाबरोबर मस्ती, व्हिडिओ व्हायरल

कसोटीमध्ये २४ वर्षीय रिषभ पंतच्या नावे आहे ३ मोठ्या विक्रमांची नोंद, धोनीलाही टाकलंय मागे

अवघड झालंय! टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला सतावत आहे ‘या’ ५ गोष्टींची चिंता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---