भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियानंतर त्याने इंग्लंडच्या फलंदाजांची नुसती दाणादाण उडवली आहे. नुकत्याच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. तत्पुर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यात तो सलामीवीर ठरला होता. परंतु भारतीय संघाच्या या ‘मॅच विनर’ खेळाडूला कधीकाळी विश्वास नव्हता की तो भारतीय संघाकडून क्रिकेट खेळेल.
यासंदर्भात खुलासा करताना अश्विन म्हणाला की, “मी योगायोगाने क्रिकेटपटू बनलो आहे. मी एक क्रिकेटप्रेमी जो क्रिकेटपटू बनला आहे. मी फक्त माझ्या स्वप्नाला इथे वास्तवात जगत आहे. मी कधीही हा विचार केला नव्हता की, मला भारतीय संघाची जर्सी घालायला मिळेल. एक असा व्यक्ती जो या खेळाशी इतके प्रेम करत असेल, त्याला खरोखरच तो खेळ खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यासाठी यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असेल.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधीची अपेक्षा नव्हती
जवळपास एका वर्षापुर्वी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दोन्ही संघांदरम्यान २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संघातील सर्व वयस्कर खेळाडू असल्याने अश्विनला पुढील दुसऱ्या सामन्यात बाकावर बसवण्यात आले होते. परंतु त्यानंतर अश्विनने आपल्या कामगिरीने संघातील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
याविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “दरवेळी जेव्हाही सामन्यातील माझी भूमिका संपते आणि मी संघाला विजय मिळतो. तेव्हा मी या गोष्टीला एका आशिर्वादाच्या रुपात घेतो. कोविड-१९ दरम्यान घालवलेल्या कालावधीत मला या गोष्टीची जाणीव झाली आहे की, मी किती भाग्यवान आहे मला भारताकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. मी आयपीएल २०२० नंतर कल्पनाही केली नव्हती की मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळायला मिळेल. माझे क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमाची ही सर्वात सुंदर भेट आहे.”
कसोटीतील ४०० विकेट्सचा टप्पा पार
अश्विनच्या कामगिरीविषयी बोलायचे झाले तर, त्याने नुकत्याच इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ८ विकेट्स चटकावत शतकही झळकावले होते. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता. याबरोबरच त्याने कसोटी कारकिर्दीतील ४०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलने केला खुलासा ‘या’ कारणामुळे रिषभ पंत त्याला म्हणतो ‘वसिम भाई’
पीटरसन पुन्हा दिसणार कर्णधाराच्या भूमीकेत, ‘या’ स्पर्धेत करणार इंग्लंडचे नेतृत्व
अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीत आढळून आली ‘मुंबई इंडियन्स’ नाव असलेली एक बॅग