भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज (२८ मार्च) खेळविला जात आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना होत असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीची नाणेफेक गमाविल्याने त्याच्याच संघसहकार्याने त्याची खिल्ली उडवली आहे.
विराटने तिसऱ्या सामन्यात गमावली नाणेफेक
भारतीय कर्णधार विराट कोहलीने वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात नाणेफेक गमावली आहे. हाच मुद्दा पकडून भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक मजेदार ट्विट केले. त्याने लिहिले, ‘कृपया टॉससाठीचे नाणे बदला.’ त्याने यासोबत हसण्याचा इमोजी वापरला आहे. तसेच सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या नावाचा हॅशटॅग लिहिला आहे.
Change the coin please! 😂😂 #matchrefree #javagalsrinath #toss #INDvsENG
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 28, 2021
अश्विनच्या या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. एका चाहत्याने यावर प्रतिक्रिया देत लिहिले, ‘आता हा एकमेव पर्याय वाटतोय’ दुसऱ्या काय ट्विटर वापरकर्त्याने म्हटले, ‘शोलेमधील ते नाणे आणायला पाहिजे.’
Indians everytime Virat Kohli goes out for a Toss!#INDvENG pic.twitter.com/LTIFkKvwYH
— Vishal Verma (@VishalVerma_9) March 28, 2021
Virat Kohli has lost 10 out of 12 toss in India vs England series…
Meanwhile fans….#INDvsENG_2021 #INDvENG @imVkohli pic.twitter.com/ukE1x3EwSB— jenish viradiya (@viradiya_jenish) March 28, 2021
As soon as Javagal Srinath looked at Jos Buttler and said 'it's head', Virat Kohli straightaway went aside and Buttler started smiling. pic.twitter.com/9Eu0DoRREe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 28, 2021
Head or tail?
Virat kohli : Both
The coin : pic.twitter.com/7UCkBQbiIZ
— Aayush (@Aayush_mali_) March 28, 2021
We are taught in School that Probability of winning a toss is 50%
Virat Kohli after loosing 10 out of 12 tosses in series: pic.twitter.com/ResRyMizoy— Enemy Slayer (@EnemySlayer24_7) March 28, 2021
वनडे संघाबाहेर आहे अश्विन
कसोटी संघाचा सर्वात मोठा मॅचविनर असलेला रविचंद्रन आश्विन २०१७ पासून वनडे संघाबाहेर आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने चार सामन्यात ३२ बळी मिळवले होते. तसेच, चेन्नई कसोटीत महत्त्वपूर्ण शतकही ठोकलेले.
विराट कोहली आणि नाणेफेक-
विराटने वनडे क्रिकेटमध्ये ५५ वेळा नाणेफेक गमावली असून केवळ ४० वेळा त्याने नाणेफेकीत यश मिळवले आहे. गेल्या १२ सामन्यात केवळ २ वेळा विराट कोहलीला नाणेफेकीत यश मिळाले आहे.